बांधकाम कामगारांसाठी गृह उपयोगी भांड्यांचे वाटप शिबिर उत्साहात संपन्न.!!!

0 35

बांधकाम कामगारांसाठी गृह उपयोगी भांड्यांचे वाटप शिबिर उत्साहात संपन्न.!!!

पाचोरा प्रतिनिधी :–

पाचोरा शहरातील शिवतीर्थ जय किसान कॉलनी येथे दिनांक १७ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता बांधकाम क्षेत्रात कार्यरत मजुरांसाठी गृह उपयोगी भांड्यांच्या संचांचे वाटप शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. हा सामाजिक व कल्याणकारी उपक्रम समाधानकारक ठरला.

या उपक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे वाटप सोहळा आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन जनसेवक बंडूभाऊ केशव सोनार यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.

या प्रसंगी मा. नगरसेवक महेश प्रकाश सोमवंशी, युवानेता सुमित दादा किशोर पाटील, उपजिल्हा प्रमुख किशोर बारवकर, प्रविण ब्राह्मणे, योगेश पाथरवाट, दिलीप परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात एकूण १५० बांधकाम मजुरांना गृह उपयोगी किट चे वाटप करण्यात आले.

शिबिराचे नियोजन आणि व्यवस्थापन हर्षल सुनील, दामोदर कुणाल, मंगल धनगर, मनीष प्रभूलाल भोई, राज सोमवंशी, सागर बंडू सोनार यांनी कौशल्याने पार पाडले.

हा उपक्रम कामगार बांधवांसाठी उपयोगी ठरल्याचे चित्र दिसून आले. सामाजिक बांधिलकी जपत गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहचवणारा हा उपक्रम सर्व स्तरांतून कौतुकास्पद ठरला.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!