अँड.बी.आर. पाटील यांच्याकडून दलालीमुक्त, माफक दरात नोटरी सेवा.!!!
भडगाव प्रतिनिधी:-
भडगाव येथील ज्येष्ठ विधिज्ञ अँड. बी.आर. पाटील यांनी नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक घोषणा केली आहे. त्यांच्या कार्यालयात आता कोणतीही दलाली न घेता, माफक दरात नोटरी सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
अँड. पाटील यांनी स्पष्ट केले की, “नोटरीच्या कामासाठी सामान्यतः अतिरिक्त ५० ते १०० रुपये दलाली म्हणून नागरिकांना द्यावे लागतात. मात्र, आता ही रक्कम द्यावी लागणार नाही. संपूर्ण सेवा थेट व पारदर्शक पद्धतीने दिली जाईल.”
या उपक्रमामागील उद्देश जनतेला प्रामाणिक सेवा देण्याचा आहे, असेही त्यांनी नमूद केले. “लोकांची आर्थिक पिळवणूक थांबावी व त्यांना थेट आणि विश्वासार्ह सेवा मिळावी, यासाठीच हा निर्णय घेतला आहे,” असे अँड. पाटील म्हणाले.
या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना आर्थिक दिलासा मिळणार असून, अनेकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
नोटरी सेवा घेण्यासाठी दिवाणी व फौजदारी न्यायालयासमोर, जगदंबा टेन्ट हाऊसच्या बाजूला थेट संपर्क साधण्याचे आवाहन अँड. बी.आर. पाटील यांनी केले आहे.