अरे बापरे जिवंत रुग्णाला मृत घोषित करून दिलं डेथ सर्टिफिकेट;अंत्यविधीच्या तयारीदरम्यान उलगडला प्रकार

उल्हासनगरमध्ये खळबळ

0 65

अरे बापरे. Tजिवंत रुग्णाला मृत घोषित करून दिलं डेथ सर्टिफिकेट;अंत्यविधीच्या तयारीदरम्यान उलगडला प्रकार

 उल्हासनगरमध्ये खळबळ

उल्हासनगर : –

उल्हासनगरमधील शिवनेरी हॉस्पिटलमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. अभिमान तायडे (वय 65) या वृद्धाला जिवंत असतानाच डॉक्टरांनी मृत घोषित करत थेट मृत्यू प्रमाणपत्र (Death Certificate) देखील देऊन टाकल्याची घटना समोर आली आहे.

ही घटना उघडकीस आल्यानंतर उल्हासनगरमध्ये एकच खळबळ उडाली असून, वैद्यकीय क्षेत्रातील हलगर्जीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

घटनेचा तपशील.

अभिमान तायडे यांची प्रकृती काही काळापासून खराब होती. काही दिवसांपूर्वी ते अचानक बेशुद्ध झाल्याने त्यांच्या मुलाने त्यांना उल्हासनगरमधील शिवनेरी हॉस्पिटलमध्ये रिक्षाने नेले. तेथे डॉ. आहुजा यांनी रुग्णाची रिक्षामध्येच तपासणी केली आणि त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर रुग्णालयाकडून थेट मृत्यू प्रमाणपत्रही देण्यात आले.

त्यानंतर अभिमान तायडे यांना त्यांच्या घरी नेण्यात आले आणि अंत्यविधीची तयारी सुरू झाली. मात्र, नातेवाईकांच्या लक्षात आलं की, त्यांच्या छातीत अजूनही धडधड आहे. तत्काळ त्यांना उल्हासनगरमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे तातडीने उपचार सुरू करण्यात आले. काही वेळातच अभिमान तायडे शुद्धीवर आले आणि त्यांचा जीव वाचला.

डॉक्टरांचं स्पष्टीकरण आणि रुग्णाची प्रतिक्रिया

या प्रकरणात डॉ. आहुजा यांनी चूक मान्य करत स्पष्टीकरण दिलं आहे की,

> “रुग्णाची नस मिळाली नाही आणि आजूबाजूच्या गोंगाटामुळे हृदयाचे ठोके ऐकू आले नाहीत. त्यामुळे चुकून मृत घोषित केलं गेलं. याबद्दल मी खेद व्यक्त करतो.”

दरम्यान, रुग्ण अभिमान तायडे यांनीही प्रतिक्रिया देताना सांगितलं की,

> “मला कावीळ झाली होती, आता माझी तब्येत बरी आहे आणि मी जेवणही केलं आहे.”

वाढते प्रश्न आणि अपेक्षित कारवाई

या प्रकरणामुळे वैद्यकीय क्षेत्रातील जबाबदारी, तपासणीची पद्धत, आणि एखाद्या व्यक्तीला मृत घोषित करताना घेतली जाणारी खबरदारी यावर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्या डॉक्टरांविरोधात काय कारवाई केली जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!