अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या मंडळ अधिकाऱ्यावर हल्ला; वाहनाची काच फोडली.!!!

0 1,022

अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या मंडळ अधिकाऱ्यावर हल्ला; वाहनाची काच फोडली.!!!

भडगाव प्रतिनिधी:-

गिरणा नदीपात्रातून सुरू असलेली अवैध वाळू वाहतूक थांबवण्यासाठी गेलेल्या प्रशासन अधिकाऱ्यावर थेट हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भडगाव तालुक्यातील पिंपळगाव परिसरात ही घटना घडली असून, मंडळ अधिकारी यांच्या  वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या. या प्रकरणी संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, दिनेश लक्ष्मणराव येंडे (वय ४०, व्यवसाय – मंडळ अधिकारी) हे दि. १० जून रोजी मध्यरात्री २.३० च्या सुमारास रात्रगस्तीसाठी गेले होते. पिंपळगाव ते भडगाव रस्त्यावर, पिरबाबा दर्गाजवळ त्यांना अडवून, आरोपी शिवबा राजेंद्र पाटील (रा. वसंदे, ता. भडगाव) याने विनाकारण शिवीगाळ करत गाडीवर दगडफेक केली. यात गाडी (क्र. एमएच ०५ ए ८६४६) चे पुढील काच फोडून नुकसान करण्यात आले.

या हल्ल्यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाला असून, भडगाव पोलीस ठाण्यात एस.एम. पनाका दाखल करण्यात आली आहे. आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता २०२३ (BNS) अंतर्गत कलम २२१, ३५२, ३२४(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस मनोहर पाटील हे करीत आहेत.

या घटनेमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून, वाळू माफियांच्या वाढत्या दादागिरीचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!