करमाड येथे तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा.!!!
पारोळा प्रतिनिधी :-
पारोळा – तालुक्यातील करमाड खुर्द येथील शिवप्रेमी सेनेतर्फे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५२ वा तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा आयोजीत करण्यात आला.शिवप्रेमी सेनेचे अध्यक्ष योगराज लोहार यांचेसह पदाधिकारी सदस्य ग्रामस्थांनी शिवरायांना,प्रभू श्रीराम यांचे पूजन करून मानवंदना दिली.अध्यक्ष लोहार यांनी छत्रपती शिवाजी महाराज,धर्मवीर छत्रपती संभाजीराजे महाराज यांचे विचार मांडले.यावेळी गणेश बोरसे,संकेत पाटील,भावेश पाटील,जितेंद्र पाटील,भैया चव्हाण,चेतन पाटील,
अविनाश देवगांवकर,स्वप्निल देवगांवकर आदी शिवप्रेमी, छत्रपती शासन मित्र मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते.