पाचोर्यातील फौजी जवान लग्नाच्या बोहल्यावरुन उतरताच देशाच्या ऑपरेशन सिंधुर साठी रवाना हळद फिटली नाही. मेहंदी मिटली नाही पाचोरा कॉग्रेस ने केला सत्कार.!!!

0 1,184

पाचोर्यातील फौजी जवान लग्नाच्या बोहल्यावरुन उतरताच देशाच्या ऑपरेशन सिंधुर साठी रवाना हळद फिटली नाही. मेहंदी मिटली नाही पाचोरा कॉग्रेस ने केला सत्कार.!!!

जळगाव प्रतिनिधी:-

मागील आठवड्यात काश्मीर पहेलगाम येथे झालेल्या पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारत सरकारने ७ मे रोजी सिंदुर ऑपरेशन यशस्वी केले आहे. यामध्ये नऊ ठिकाणी हवाई मारा करत पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला असून भारत आणि पाकिस्तान मध्ये कोणत्याही वेळेला युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते यामुळे जे जवान घरी सुट्टीसाठी आले होते अशा सर्व जवानांना सीमेवर बोलवण्याचे आदेश प्राप्त झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

 

 

यामध्ये जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे गावातील असलेल्या मनोज ज्ञानेश्वर पाटील यांचा चि. सौ. का. यामिनी हिच्याशी नुकताच ५ मे रोजी विवाह संपन्न झाला होता. परंतु विवाह झाल्यावर तात्काळ त्यांना सेवेमध्ये रुजू होण्याचे आदेश आले आहेत.

 

मनोज याने आपल्या अर्धांगिनीला परत येण्याचा विश्वास देऊन देशाची सेवा करण्याचा मार्ग निवडला असून देशसेवेचे धाडस दाखवून पुन्हा आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी रवाना झाला आहे.

 

या धाडसी निर्णयाचे सर्वत्र परिसरात मनोज पाटील यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे यावेळी कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी जवान मनोज पाटील यांच्या घरी जाऊन सत्कार केला युद्ध होवु नये आणि जवान परत यावा म्हणून परमेश्वराला पार्थना केली.

 

पाटिल परीवाराला धिर देत आपल्या उत्तर महाराष्ट्रातील हा अभिमानाचा दिवस आहे देशाच्या सुरक्षिततेसाठी जवान मनोज पाटील यास हळद फिटली नाही आणि मेहंदी मिटली नाही अशा स्थितीत कॉल येणे हा सर्वांनासाठी अभिमान वाटावा असा प्रसंग असल्याचे शेवटी श्री सोमवंशी म्हणाले.

 

पाचोरा शहरातील स्व. राजीव गांधी कॉलनीत सद्ध्या मनोज पाटील यांचा रहीवास होता तेथुनच ते रवाना झाले.

 

त्याचबरोबर गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने सदर सैनिक आमच्या गावाची शान असून आमचा सैनिक एक नव्हे तर दहा पाकिस्तानीचा खात्मा करूनच विजय मिळवतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला आहे.यावेळी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विजयसिंग पाटील यांनी देखील सत्कार केला.

 

पाचोरा रेल्वे स्थानकावर जवान मनोज पाटील यांस देशाच्या सरहद्दीवर रवाना करतांना आई वडील आणि पत्नी भाउ सह इतरांचे अश्रू अनावर झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!