खळबळजनक :कौटुंबिक वादातून.पत्नीच्या नातेवाईकांनी तरुणावर धारदार शस्त्राने वार बंदुकीतून दोन राऊंड फायर करून केला खून.!!!

जळगाव शहरात कालिका माता मंदिर परिसरात घडली घटना. •••

0 17

खळबळजनक :कौटुंबिक वादातून.पत्नीच्या नातेवाईकांनी तरुणावर धारदार शस्त्राने वार बंदुकीतून दोन राऊंड फायर करून केला खून.!!!

 

जळगाव शहरात कालिका माता मंदिर परिसरात घडली घटना. •••

जळगाव प्रतिनिधी :-

शहरातील राष्ट्रीय.महामार्गावर कालिका माता मंदिर भागाच्या पुढे एका ३० वर्षीय तरुणाची निघृण हत्या करण्यात आल्याची घटना शनिवार दि. ३ मे रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून संशयित आरोपींच्या मागावर पोलीस लागली आहे

आकाश पंडीत भावसार (सोनार, वय ३०, रा. अयोध्या नगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी, 2 मुलं असा परिवार आहे. तो ट्रान्सपोर्ट नगरामध्ये गाडी भरण्याचे एजंट म्हणून काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता.

(केसीएन) दरम्यान अनेक महिन्यांपासून आकाशची पत्नी व तीच्या परिवारासोबत कौटुंबिक वाद निर्माण होता. सातत्याने ती माहेरी येत जात असायची काही दिवसांपासून तो पत्नीला घेऊन वेगळा राहात होता. त्यामुळे त्यांच्या घरी नेहेमी कौटुंबिक वाद सुरू असायचा आज शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास आकाशच्या सासरच्या मंडळींनी हॉटेल ए वन जवळ आकाश सोनार याला गाठले. कौटुंबिक वादातून आकाशवर संशयित आरोपींनी धारदार शस्त्राने मांडीवर, छातीवर आणि गुप्तांगाला गंभीर वार करून जखमी केले सोबत दोन राऊंड बंदुकीचे फायर केले

आकाश यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय पथकाने तपासून त्याला मयत घोषित केले. दरम्यान, रुग्णालयात उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, शनिपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले आहेत. ४ संशयीत तरुणांची नावे समोर आली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा