वाडे गावात विविध ठिकाणी ध्वजारोहण.!!!
भडगाव प्रतिनिधी :—
भडगाव तालुक्यातील वाडे गावात १ मे महाराष्टृ दिन व कामगार दिनानिमित्त विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.
वाडे ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण ग्रामपंचायतीचे कर्मचारी बांधव सतीष पाटील, नितीन पाटील, पप्पु माळी, कोतवाल आबा मोरे आदिंचे हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच ललीता माळी, उपसरपंच गुलाब पाटील व सदस्य पदाधिकारी, कर्मचारी, आरोग्य केंद्राचे कर्मचारी, नागरीक उपस्थित होते.
जिल्हा परीषद शाळेत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हेमराज सरदार माळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हा परीषद शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र वाणी, जिल्हा परीषद कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका भारती तोमर तसेच शिक्षक, शिक्षीका, अंगणवाडी सेविका , मदतनीस, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, विदयार्थी, विदयार्थीनी उपस्थित होत्या.
नेताजी सुभाष ग्राम वाचनालयाचे ध्वजारोहण संचालक अशोक महादु परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वाचनालयाचे चेअरमन दिनकरराव पाटील, व्हाईस चेअरमन शामराव माळी,संचालक नामदेव माळी, हिलाल चौधरी, नामदेव पाटील, योगेश परदेशी, सचीव ओंकारदास बैरागी, ग्रंथपाल देविदास पाटील, विदयालयाचे मुख्याध्यापक एन. एस. बोरसे, भिमसिंग अमरसिंग परदेशी,एस. डी. पाटील यांचेसह शिक्षक, विदयार्थीनी उपस्थित होत्या.विदयार्थीनींनी यावेळी झेंडागीत म्हटले. सुञसंचलन एस. एस. पाटील यांनी केले.
माध्यमिक विदयालयाचे ध्वजारोहण वरिष्ट लिपीक शाम मोरे, कनिष्ट लिपीक शुभम मोरे, सेवक दिपक सुर्यवंशी आदि शिक्षकेतर कर्मचारी बांधवांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विदयालयाचे मुख्याध्यापक एन. एस. बोरसे, पर्यवेक्षक एस. टी. पाटील, यांचेसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, विदयार्थी, विदयार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होत्या. विदयार्थीनींनी झेंडागीत म्हटले. यावेळी सुञसंचलन एस. एस. पाटील यांनी केले.