प्रेयसीला भेटायला घरी गेला, घरच्यांनी मुलीच्या हाती दिलं ब्लेड अन् प्रियकराचं गुप्तांगच कापलं.!!!
उत्तर प्रदेशातील गोरखपूर शहरात एक खळबळजनक घटना घडल्याचं समोर आलं आहे. रात्री आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेल्या तरुणाला मुलीच्या घरच्यांनी रंगेहाथ.पकडलं आणि त्यानंतर मुलीच्या भावांनी त्याला बेदम मारहाण केली.
मुलीचे कुटुंबीय एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी चक्क मुलीच्या हातात ब्लेड देऊन तरुणाचं गुप्तांगच कापून टाकलं. असा आरोप मुलाच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, अगदी गंभीर स्वरुपात जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यासंदर्भात दोन्ही कुटूंबाकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
खरंतर, गोरखपूरच्या गुलरीहा पोलीस स्टेशन परिसरातील सरैया बाजारात राहणाऱ्या एका व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार केली आणि सांगितले की, त्याचा 22 वर्षांचा मुलगा रात्री शेतातून परतत होता. दरम्यान, घरापासून काही अंतरावर राहणाऱ्या एका मुलीने त्याला फोन केला. ती मुलगी मुलापेक्षा 8 वर्षांनी मोठी आहे आणि ती २ वर्षांपासून त्याच्या मुलाशी फोनवर बोलत आहे.
रात्री प्रेयसीला भेटायला गेल्यावर काय घडलं?
मुलीने तरुणाला रात्री भेटायला बोलवलं होतं. पण तेव्हाच मुलीच्या चार भावांनी तरुणाला पकडलं आणि बेदम मारहाण केली. त्या चौघांनीही मुलीचे दोन्ही हात आणि पाय धरले आणि नंतर तिला ब्लेड देऊन त्या मुलाचे गुप्तांग कापायला लावले. यानंतर मुलीच्या घरच्यांनी तरुणाला घराबाहेर हाकलवून दिले.
गावातील काही तरुणांनी या घटनेची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, घटनास्थळी पोहोचताच त्या मुलाला ताबडतोब गोरखपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये नेलं. सध्या तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच, त्याची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. तरुण मुलाच्या कुटुंबीयांच्या मते, मुलगा वारंवार बेशुद्ध पडत आहे.
तरुणाच्या कुटुंबीयांना केले गंभीर आरोप
तरुणाच्या वडिलांनी सांगितले की, ‘या लोकांशी यापूर्वी खूप वाद झाला होता आणि त्यानंतर त्यांच्याशी आम्ही कोणताही संबंध ठेवला नाही. तरी देखील त्या मुलीने माझ्या मुलाला त्याच्याशी प्रेमसंबंध ठेवून तिच्या जाळ्यात अडकवले आणि जवळजवळ 2 वर्षांपासून ती त्याच्याशी फोनवर बोलत होती.” तसेच, मुलीने रात्री उशिरा आपल्या मुलाला फोन करून बोलावले आणि ही घटना घडवून आणली.’ असा आरोप त्यांनी केला. सध्या मुलाची प्रकृती गंभीर आहे.
या प्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. रात्रीच्या वेळी तरुण जबरदस्तीने घरात घुसला, असं तक्रारीत म्हटलं आहे. त्याने काहीतरी चुकीचे करण्याचा प्रयत्न केला आणि त्या बदल्यात मुलीने त्याचं गुप्तांग कापलं. असंही तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. या प्रकरणात, गोरखपूरचे एसपी सिटी अभिनव त्यागी म्हणाले की, यासंबंधीची माहिती आम्हाला मिळाली आहे. दोन्ही बाजूंकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि पुढील कारवाई केली जात आहे.