सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; तुमचे जुने सिम कार्ड बंद होण्याची शक्यता, Jio, Airtel, Vi युजर्सवर होणार परिणाम.!!!
सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; तुमचे जुने सिम कार्ड बंद होण्याची शक्यता, Jio, Airtel, Vi युजर्सवर होणार परिणाम.!!!
भारतात मोबाईल युजर्सची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. इतकेच नाही तर अनेकांच्या मोबाईलमध्ये दोन-दोन सिम कार्ड आहेत. मोबाईल फोनमध्ये सिम कार्ड हा खूप महत्त्वाचा असतो.
सिम कार्ड खरेदी करताना प्रत्येक युजर हा आपल्या आयडी कार्ड, फोटोचे पुरावे देतो. पण आता सरकार जुन्या मोबाईल सिम कार्ड संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. तसे झाले तर तुमचे जुने सिम कार्ड बंद होईल. जाणून घेऊयात या संदर्भात सविस्तर…
NCSC म्हणजेच नॅशनल सायबर सिक्युरिटी कोऑर्डिनेटरने केलेल्या चौकशीनंतर सिम कार्ड बदलण्याचा विचार केला जात आहे. सरकारने जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडियाच्या अधिकाऱ्यांसोबत या संदर्भात एक बैठकही आयोजित केली आहे. मिंटच्या रिपोर्टनुसार, एनसीएससीच्या तापासणीत काही सिम कार्डमध्ये चीनमध्ये बनवण्यात आलेल्या चिपसेट आढळून आल्याचं समोर आलं आहे. यामुळे सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, सिम कार्डमध्ये आढळणारे चिपसेट ग्राहकांची ओळख स्टोअर करतात.
जुने सिम कार्ड बदलण्याच्या निर्णयात तांत्रिक आणि कायदेशीर आव्हाने उभी राहू शकतात. रिपोर्ट्सनुसार, एससीएससी आणि गृह मंत्रालय संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करत आहेत. सर्वप्रथम जुने सिम कार्ड बदलण्याचा विचार केला जात आहे. रिपोर्ट्समध्ये सांगितले की, एनसीएससीने रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे बैठकीत दूरसंचार संसाधनांच्या खरेदीतील सुरक्षा त्रृटी दूर करण्यावर चर्चा झाली. सिम कार्ड बदलण्यासाठी एक फॉरमॅट कसा तयार करता येईल यावर चर्चा झाली.
चीनी उपकरणांवर बंदी
भारत करकारने काही वर्षांपूर्वी प्रमुख चिनी कंपन्यांच्या वस्तूंवर बंदी घातली होती. चिनी कंपनी हुवावे आि जेडटीई या आता भारतीय कंपन्यांसोबत काम करत नाहीत. अमेरिकेने सुद्धा हुवावेवर निर्बंध कठोर केले आहेत. रिपोर्टमध्ये म्हटले की, सरकारच्या मंजुरीशिवाय चीनमधून सिम चिपसेट खरेदी केल्याने टेलिकॉम ऑपरेटर्सच्या सोर्सिंगवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. टेलिकॉम ऑपरेटर्सला सुद्धा माहिती नव्हते की, खरेदी केल्या जाणाऱ्या सिम कार्डमध्ये चिनी चिप्स आहेत.
भारतातील मोबाईल युजर्सची संख्या
भारतात मोबाईल युजर्सची संख्या खूपच मोठी आहे. जवळपास 1.15 अब्ज युजर्स आहेत. रिपोर्ट्सनुसार, यापैकी काही सिम कार्डमध्ये चीनमध्ये बनवलेल्या चिपसेट आहेत. मात्र, या चिप्स नेमक्या किती आहेत याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये.
सिम बदलल्यास काय होईल.?
जुने सिम कार्ड बंद करुन त्याऐवजी नवे सिम कार्ड बदलून सरकार भविष्यात चिनी चिप्स असलेले सिम कार्ड भारतीय बाजारपेठेत येऊ नयेत याची खबरदारी घेऊ इच्छित आहे. या कामात काही तांत्रिक आणि कायदेशीर अडचणींची शक्यता आहे. सिम कार्ड बदलण्याचा खर्च टेलिकॉम ऑपरेटर्सकडून घेतला जाण्याची शक्यता आहे.