भडगाव शेतकरी संघाचे भरडधान्य खरेदीचे पोर्टल सुरु २७ जणांची नोंदणी तर ६६४ टोकन वाटप-.!!!

0 17

भडगाव शेतकरी संघाचे भरडधान्य खरेदीचे पोर्टल सुरु २७ जणांची नोंदणी तर ६६४ टोकन वाटप-.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव शेतकरी सहकारी संघाचे शासनाच्या भरडधान्य खरेदीसाठीचे पोर्टल अखेर सुरु झालेले आहे. सकाळपासुन दुपारपर्यंत एकुण २७ शेतकऱ्यांची नावे ऑनलाईन नोंदणी झालेली आहे. शेतकरी सहकारी संघात शेतकऱ्यांसाठी मंडप व पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे.

पोर्टल संथ गतीने चालत होते त्यामुळे ऑनलाईन नाव नोंदणीला वेळ लागत होता.मात्र शेतकरी सहकारी संघात शेतकऱ्यांची नावे रजिष्टरमध्ये नोंदवुन आता पर्यंत शेतकऱ्यांना जवळ जवळ ६६४ टोकन देण्यात आले आहेत.

मात्र टोकन देतांना मोठा गोंधळ झाला. टोकन देतांना वशिलेबाजी झाल्याचा आरोपही काही शेतकरी राजरोसपणे उघड पध्दतीने करीत होते. काही शेतकऱ्यांनी वशिलेबाजी ने नाव नोंदणी होत असल्याबाबदची तक्रार देखिल तहशिलदारांकडे केलेली आहे. शेतकरी सहकारी संघानेही कोणत्याही प्रकारची वशिलेबाजी न करता आणि कोणाचाही राजकीय हस्तक्षेप होणार याकडे जाणिवपूर्वक लक्ष द्यावे. शेतकरी संघाने जर नाव नोंदणी करताना वशिलेबाजी केली तर संतप्त शेतकरी त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.ऑनलाईन नाव नोंदणी करतांना ओढाताणीमध्ये संगणकाच्या वायरी तुटुन टेबलाचीही तोडफोड झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे काही तास नाव नोंदणी बंद होती. पोलीसांचा बंदोबस्त देखिल वाढविण्यात आला होता. दिवसभर शेतकरी ब्रेक के बाद याप्रमाणे याठिकाणी नाव नोंदणी व टोकन मिळविण्यासाठी बराच त्रास सहन करून उन्हातान्हात थांबुन होते. टोकन वाटपाचे काम सुरु होते.

प्रतिक्रिया :

“सर्व शेतकऱ्यांचे ऑनलाईन नाव नोंदणी करण्यात येईल. कुणीही शेतकरी वंचित राहणार नाही .”

भैय्यासाहेब पाटील

अध्यक्ष

शेतकरी संघ, भडगाव.

प्रतिकिया :

“नाव नोंदणी करताना फक्त आणि फक्त शेतकरी वर्गालाच प्राधान्य द्यावे. व्यापारी मंडळींची नाव नोंदणी करू नये. व्यापारीच जास्त गर्दी करतात आणि वशिलेबाजीने नावे नोंदवितात त्यामुळे खरा शेतकरी वंचित राहतो. ”

गणेश काशिनाथ नरवाडे

शेतकरी, भडगाव.

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा