अवैध धंद्याची बातमी प्रसारित केल्याचा रागातून पत्रकारास जिवे ठार मारण्याची धमकी देत शिवीगाळ; पाचोरा पोलीसात गुन्हा दाखल.!!!
अवैध धंद्याची बातमी प्रसारित केल्याचा रागातून पत्रकारास जिवे ठार मारण्याची धमकी देत शिवीगाळ पाचोरा पोलीसात गुन्हा दाखल.!!!
पाचोरा प्रतिनिधी :-
पाचोरा शहरासह ग्रामिण भागात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे गावठी दारू, ऑनलाईन चक्री, सट्टा पत्ता,मटका, राजरोसपणे सुरू आहे.त्या अवैध धंद्यांना चपराक बसावा म्हणून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून समाजात ओळख असणाऱ्या पत्रकारांनी या अवैध धंदे संबंधित बातम्या प्रसारित केल्या,त्यात वेध माझा न्युजचे संपादक पत्रकार राकेश सुतार, यांनी देखील बातमी प्रसिद्ध केली त्या कारणावरुन अवैध धंदे चालवणारा तरुणाने छत्रपती शिवाजी महाराज चौक परीसरात शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
या बाबत पत्रकार राकेश सुतार यांनी पाचोरा पोलीसात रितसर फिर्याद दिली त्यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की,फिर्यादी मी राकेश सुभाष सुतार (वय २४) रा.नंदवन सिटी जुना अंतुर्ली रोड पाचोरा यास दिनांक २३ मार्च २०२५ रोजी ०३:३० वाजेचा सुमारास शेखर सुधाकर पाटील रा.कुष्णापुरी पाचोरा याने फिर्यादीस तु अवैध धंद्यांवर बोलतो बातमी व्हॉट्सॲप वर प्रसारीत करतो याबाबत आरोपीताच्या मनात राग निर्माण झाला आज रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक निलम हॉटेल समोर फिर्यादी आपल्या पत्रकार मित्रांसोबत ०३;०० वाजेचा सुमारास चर्चा करत असतांना आरोपी नामे शेखर पाटील उर्फ भोला याने फिर्यादीस तु अवैध धंदे बाबत बातम्या प्रसारित करतो मी तुला जिवंत ठेवणार नाही तसेच रात्री तुझा कार्यक्रम करेल अशी धमकी देत शिवीगाळ केली तसेच आरोपीने स्व:ताचे हाताने डोक्यात वीट मारुन घेतली,मी तुझ्या नावाची तक्रार देतो पोलीस स्टेशनमध्ये अशी धमकी हि दिली दिलेल्या फिर्यादीवरून भा.द.वि.३५२,३५१(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी पत्रकार सोरक्षन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जिल्हा भरातील पत्रकार बांधव यांच्या कडुन होत आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत.
चौकट :
गेल्या आठ दिवसांपुर्वी पाचोरा शहर पिंपळगाव हरेश्र्वर, ग्रामीण भागात अवैध धंदे गावठी दारू,ऑनलाईन चक्री, सट्टा मटका, पत्त्याचे कल्ब राजरोसपणे असल्याबाबत पत्रकारांनी बातम्या प्रसारित केल्यात परंतु आश्चर्याची बाब म्हणजे पोलीसांनी एकही कारवाई केलेली दिसुन येत नाही.यावरुन असे स्पष्ट होते की पोलीस आणि अवैध धंदे व्यावसायीकांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण सुरू असेल.
म्हणुन ते कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाहीत,पोलीसांचा आशिर्वादानेच हे मस्तावलेले अवैध धंदे वाले पत्रकारांना शिवीगाळ अरेरावीची भाषा, जिवे ठार मारण्याची धमकी देतात असं सुज्ञ नागरिक आपलं मत व्यक्त करत आहेत.