राही मल्टीपर्पज फाउंडेशन तर्फे१०० कीटचे वाटप.!!!
राही मल्टीपर्पज फाउंडेशन या संस्थेने रमजानच्या पार्श्वभूमीवर सर्वधर्मातील गोरगरीब जनतेला जीवनावश्यक वस्तूंच्या १०० कीटचे वाटप केले.
राही मल्टीपर्पज फाउंडेशन तर्फे१०० कीटचे वाटप.!!!
राही मल्टीपर्पज फाउंडेशन या संस्थेने रमजानच्या पार्श्वभूमीवर सर्वधर्मातील गोरगरीब जनतेला जीवनावश्यक वस्तूंच्या १०० कीटचे वाटप केले.
राही मल्टीपर्पज फाउंडेशन तर्फे कीटचे वाटप
रमजानच्या पार्श्वभूमीवर जपली सामाजिक बांधिलकी
भडगाव तालुक्यात ः राही मल्टीपर्पज फाउंडेशने रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर सर्वधर्मातील गोरगरीब जनतेला जीवनावश्यक वस्तूंच्या १०० कीटचे वाटप करून संस्थेने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे
राही मल्टीपर्पज फाउंडेशन गेल्या ०१ वर्षे सातत्याने शैक्षणिक क्षेत्रात व आरोग्य क्षेत्रात आणि सामाजिक कामात सहभाग घेत आहे तसेच गरजवंत लोकांचे मदत फाउंडेशनच्या माध्यमातून करीत आहे याचा एक भाग म्हणून पवित्र रमजान महिन्यात गोरगरिबांना अन्नधान्याचे कीटचे वाटप करत आहेत. यावर्षी संस्थेने आत्तापर्यंत १०० कीटचे वाटप केले. भडगाव तालुक्यातील लोकांना ही कीट वाटली. रमजान कीटमध्ये २ किलो तांदूळ तसेच गहू , प्रत्येकी ३ किलो डाळी व इतर कडधान्य,२ किलो साखर, बेसन, चहापावडर, हळद,मीठ, मसाला, आंघोळीचा साबण खोबर तेल वगैरे तसेच काही ठिकाणी ड्रेस आदी वस्तूंचा या कीटमध्ये समावेश आहे
संस्थेचे अध्यक्ष दानिश आलम, उपाध्यक्ष अबरार मिर्झा, सचिव मुज्जमील शेख,खजिनदार जमाल कासार,सदस्य जुबेर बेग, सदस्य जुनेद मन्यार, एडवोकेट सिद्दिक शेख हे परिश्रम घेत आहे
तसेच सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपण जास्त जास्त राही मल्टीपर्पज फाउंडेशन ला मदत करावी असे आवाहन संचालक मंडळाने केले आहे