अखिल भारतीय मराठा महासंघ तर्फे शालेय साहित्य व फल वाटप.!!!

सामाजिक न्याय व संघटन साठी स्वतः चे बलिदान देणारं व्यक्तिमत्व म्हणजे कै आ. अण्णासाहेब पाटील - विश्वास पाटील

0 225

अखिल भारतीय मराठा महासंघ तर्फे शालेय साहित्य व फल वाटप.!!!

 

सामाजिक न्याय व संघटन साठी स्वतः चे बलिदान देणारं व्यक्तिमत्व म्हणजे कै आ. अण्णासाहेब पाटील – विश्वास पाटील

 

अमळनेर प्रतिनिधी :-

अंमळनेर तालुक्यातील ढेकु सिम येथे अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त शालेय साहित्य व फळ वाटप करण्यात आले,..

अंमळनेर तालुक्यातील जि.पःशाळा ढेकूसिम येथे गरीब व गरजू विद्यार्थ्याना शालेय साहित्य करण्यात आले. समयी सर्वप्रथम आलेल्या मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले, त्यानंतर आलेल्या मान्यवरांचे स्वागत करून, अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांची कार्याची माहिती देण्यात आली या समयी उत्तर महाराष्ट्र प्रमुख डॉ. बी बी भोसले सर

यांनी मुलांना अण्णासाहेब पाटील याच्या कार्यविषयीं मार्गदर्शन केले, त्यानंतर जळगाव जिल्हा उपाध्यक्ष विश्वास पाटील सर यांनी कै आ. अण्णासाहेब पाटील याची जीवन कथा सांगत यांची सामाजिक बांधिलकी व संघटन विषयी माहिती दिली, समाजाला न्याय न मिळाल्याने स्वतःचे जीवाचा त्याग करून आहुती देणार उदार दातृत्व असणारे व्यक्तिमत्व म्हणजेच आमदार अण्णासाहेब पाटील हे होय. असे गौरवद्गगार त्यांनी समयी काढले,

संघटन शक्तीचे महत्व याविषयी त्यांनी उदाहरण देऊन सांगितले,

या समयी सरपंच सौं सुरेखा पाटील, शरद पाटील, किशोर पाटील, यांनी आपले मनोगत व्यक्ती केलेत सदर कार्यक्रम चे मुख्य आकर्षक व आयोजक ढेकू सिम येथील व अखिल मराठा महासंघाचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष उमेश पाटील यांनी केले होते

कार्यक्रम साठी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख डॉ बी बी भोसले. जिल्हा उपाध्यक्ष विश्वासराव पाटील सर, सरपंच सुरेखा प्रविण पा., शरद पाटील क्रूषी उत्पन्न बाजार समिती संचालक अमळनेर, किशोर पाटील उपसरपंच आर्डी शरद पाटील तालुका अध्यक्ष, गोकुळ पाटील पिंपळे, उमेश पाटील ग्रामिण जिल्हाध्यक्ष तसेच पुरुषोत्तम चौधरी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य सदस् ढेकु सिम आदी मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रम चे प्रास्ताविक गजानन चौधरी सर यांनी केलं तर आभार उमेश पाटील यांनी मानले

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा