भडगाव येथील लोकन्यायालयात वादपूर्व तसेच प्रलंबित प्रकरणे मिळवून एकूण 63 प्रकरणांचा निपटारा व रु. 44,01,131.00 रकमेची वसुली.!!!

0 48

भडगाव येथील लोकन्यायालयात वादपूर्व तसेच प्रलंबित प्रकरणे मिळवून एकूण 63 प्रकरणांचा निपटारा व रु. 44,01,131.00 रकमेची वसुली.!!!

 

दिनांक 22/ 03/ 2025 रोजी दिवाणी व फौजदारी न्यायालय भडगाव जिल्हा जळगाव येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांचे निर्देशाप्रमाणे तालुका विधि सेवा समिती भडगाव व मा. वकील संघ भडगाव यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. सदर लोकन्यायालयात दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणे आपसात तडजोडीने मिटवण्याकरिता ठेवण्यात आलेली होती. सदर लोकन्यायालयात प्रलंबित प्रकरणे 28 व वादपूर्व प्रकरणे 35 असे एकूण 63 प्रकरणे निकाली काढण्यात आली व सदर प्रकरणात रक्कम रु. 4401131.00 चौरेचाळीस लाख एकशे एकतीस रकमेची तडजोड करण्यात आली. व लोक अदालतीचे पॅनल प्रमुख म्हणून श्रीमती व्ही एस मोरे, दिवाणी न्यायाधीश क स्तर भडगाव, प्रा. वि.राजळे सह दिवाणी न्यायाधीश व पॅनल सदस्य म्हणून ऍड व्ही आर महाजन यांनी कामकाज पाहिले. सदर लोक न्यायालयात भडगाव वकील संघाचे अध्यक्ष ऍड बी. आर. पाटील उपाध्यक्ष ऍड श्री बी.टी. अहिरे सचिव ऍड श्री बी. आर. ठाकरे, श्री ऍड. आर के वाणी,श्री.ऍड. के.टी. पाटील. ऍड पी के जयस्वाल, ऍड.एच.ए. कुलकर्णी, ऍड. ए.डी. बाग, ऍड पी.बी. तिवारी,ऍड. एन जे.तिवारी, ऍड. एम. बी. पाटील, ऍड. एस. आर.सोनवणे, ऍड.सरकारी अभियोक्ता आय. ए. रंगरेज, पीएसआय रमण कंडारे, सर्व विधीज्ञ पक्षकार तसेच मा. तालुका विधी सेवा समिती भडगाव येथील सहाय्यक अधीक्षक श्री बी.

ए.बारी विधी सेवा समिती भडगाव येथील वरिष्ठ लिपिक श्री एस. एस. रानडे, श्री.एन. एम.पाटील, दीपक पाटील, श्री रमेश चव्हाण, अभिजीत दायमा, होतीलाल पाटील, अनिल गोधने, संदीप परदेशी, प्रकाश सोनवणे, जगदीश वाडीले, नितीन कदम, न्यायालयीन कर्मचारी व बँकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत नगरपालिका यांचे कर्मचारी देखील उपस्थित होते. वरील सर्व उपस्थितानी सदर लोकन्यायालय यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा