सेक्स करताना तरुणाला आला Heart Attack! नेमकं घडलं तरी काय.?
हार्ट पेशंटसाठी सेक्स करणं धोकादायक.? डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं. •••••
नागपूरमध्ये 28 वर्षांच्या तरुणाला सेक्स करताना हार्ट अटॅक आल्याची धक्कादायक घटना घडली. बंगळुरुच्या उद्योगपतीचा सेक्स करताना हार्ट अटॅकने मृत्यू झाला.
या तरुणाने सेक्स पॉवर वाढवण्यासाठी औषधांचा सेवन केलं आणि त्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. अशातच एक सवाल उपस्थित होतो की, हार्ट पेशंटसाठी सेक्स करणं जीवघेणं होऊ शकतं? सेक्स वर्धक औषधेही धोकादायक ठरू शकतात? जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
अशा बातम्या समोर आल्यानंतर हार्ट पेशंटच्या मनात भीती निर्माण होते की, सेक्स करणं धोकादाय होऊ शकतं. ज्या रुग्णांना हार्ट अटॅकला येऊन गेला आहे, त्यांच्या मनात याबाबत भीती वाढली आहे. परंतु, या गंभीर समस्येबाबत सिबिया मेडिकल सेंटर, लुधियानाचे डायरेक्टर आणि कार्डियोलॉजिस्ट डॉ. सुखविंदर सिंग यांनी ‘द लल्लन टॉप’ चॅनेलशी बोलताना सविस्तर माहिती दिलीय. त्यांनी सांगितलं की, हार्ट पेशंट नेहमी विचारतात की आम्ही सेक्स करू शकतो का?, तर याचं उत्तर हो किंवा नाही असं म्हणता येणार नाही. सिंग यांनी सांगितलं की, पेशंटची समस्या काय आहे, यावत ते अवलंबून असतं.
हार्ट पेशंटसाठी सेक्स करणं धोकादायक.?
डॉ. सुखविंदर यांच्या माहितीनुसार, सेक्स हार्ट पेशंटसाठी धोकादायक होऊ शकतो. परंतु, घाबरण्यासारखी गोष्ट नाही. सेक्स करताना योग्य ती काळजी घेतली किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतला, तर कोणतीही समस्या निर्माण होत नाही. सेक्स दरम्यान हार्ट अटॅक येणे, असं खूप कमी वेळा घडतं.
डॉ. सुखविंदर यांच्या माहितीनुसार, हार्ट पेशंट सेक्स करण्यासाठी किती फिट आहेत, ते स्वत: तपासू शकतात. पेशंटला माइल्ड हार्ट डिसीज असेल, त्याने दोन फ्लोअरपर्यंत पायऱ्या चढून पाहावं की, त्यांना हार्टचा त्रास होतोय की नाही..जर त्यांनी आरामात दोन फ्लोअर पायऱ्या चढल्या. तर ते सामान्यपणे सेक्स करू शकतात.
पेशंटला जर सेवियर हार्ट डिसीज असेल, तर त्यांनी टेस्ट करायला पाहिजे. जसं की टीएमटी (ट्रेडमिल टेस्ट), 2 डी इको आणि इसीजी करायला पाहिजे. या टेस्टनंतरच निर्णय घ्यायला पाहिजे की, त्यांनी सेक्स करावं की नाही..एखाद्याची हार्ट सर्जरी झाली असेल, तर ते 6 आठवड्यांपासून काही महिन्यानंतर सेक्स करू शकतात. प्रत्येक रुग्णाची केस वेगळी आहे. अशातच डॉक्टरचा सल्ला महत्त्वाचा आहे.
औषधे किती धोकादायक?
वायग्रासारखी सेक्सवर्धक औषधे किती धोकादायक असतात? डॉ. सुखविंदर यांच्या माहितीनुसार, अशाप्रकारची औषधे घेण्याआधी डॉक्टरांकडून कंसल्ट करून घ्या की, ही औषधे हार्टच्या औषधांसोबत इंटेक्ट झाल्यावर धोकादायक ठरू शकतात की नाही..जर हार्ट पेशंट सेक्स करत असेल, त्यावेळी अचानक डोकेदुखी, चक्कर येणे, घाम फुटणे, असा समस्या जाणवल्यावर तातडीनं विश्रांती घ्या किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.