दारावर तलवारींनी हल्ला. 10 वाहने जाळली; होरपळलेल्या नागपुरकरांनी सांगितली आपबिती.!!!

0 14

दारावर तलवारींनी हल्ला. 10 वाहने जाळली; होरपळलेल्या नागपुरकरांनी सांगितली आपबिती.!!!

नागपूरात दोन गटात झालेल्या राड्यानंतर आता शहरातील परिस्थिती शांततापूर्ण होत आहे, 17 मार्च 2025 सायंकाळी शहरात हिंसाचार उसळला होता. एका गटाने दुपारी केलेल्या केलेल्या आंदोलनानंतर सायंकाळी दुसऱ्या गटाने दगडफेक आणि पोलिसांवर हल्ला केला होता.

8 ते 10 वाहने पेटवून दिली

एवढेच नाहीतर एएनआयने एक व्हिडिओ आपल्या एक्स अकाऊंटवर जारी केला आहे. त्यानुसार,हिंसाचारात अनेक घरांनाही लक्ष्य करण्यात आले. तसेच अनेक घरांचे दरवाजे तोडण्याचा प्रयत्नही हल्लेखोरांनी केला. हल्लेखोरांनी वाहनेही पेटवून दिली, हल्ला करणाऱ्यांनी आमच्या घराच्या काचाही फोडल्या असे लोक सांगत आहेत. घरांवर हल्ल्याचा प्रयत्न केला मात्र त्यात यश न आल्याने त्यांनी वाहने पेटवून दिली. या हल्लेखोरांनी एका ठिकाणी वाहने जमा करून 8-10 वाहने पेटवून दिली आहेत.

महिलेने सांगितली आपबिती

नागपुरात औरंगजेबाच्या कबर पाडण्याच्या वादातून नागपुरात दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडली. या काळात अनेक घरांवर हल्लेही झाले आहेत. नागपुरातील हंसापुरी येथे राहणाऱ्या लोकांनी या हिंसाचाराबद्दल आपले मत व्यक्त केले. एनआयच्या व्हिडिओत महिला सांगते की, घरावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांच्या हातात तलवारी होत्या. तलवारीचा वापर करून घराचे दरवाजे त्यांनी तोडले. एवढेच नाही तर आमच्या घरावरही दगडफेक केली. त्यावेळी आम्ही खूप घाबरलो. अशी घटना यापुर्वी कधी घडलेली नाही.

आग आटोक्यात आणताना माझ्यावर दगडफेक – स्थानिक

एनआयच्या व्हिडिओनुसार, नागपूरच्या हिंसाचारग्रस्त हंसापुरी भागातील एक स्थानिक दुकानदार सांगतो, “रात्री 10.30 वाजता मी माझे दुकान बंद केले. अचानक, मला लोक वाहने पेटवताना दिसले. मी आग विझवण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्यावर दगडफेक झाली. माझी दोन वाहने आणि जवळपास उभी असलेली इतर काही वाहने जाळण्यात आली.” असे स्थानिक सांगतो.

आधी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना केले लक्ष

आणखी एक स्थानिक सांगतो, “संपूर्ण घटनेच्या दीड तासानंतर पोलिस येथे आले. ज्या लोकांनी हे केले त्यांनी प्रथम सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना लक्ष्य केले आणि त्यांचे नुकसान केले.” असेही स्थानिकाचे म्हणणे आहे.

नागपुरात काही भागात संचारबंदी

पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी नागपुरात 17 मार्चला घडलेल्या घटनेच्या पार्श्वभुमीवर संचारबंदी लागू केली आहे. नागपूर पोलिसांनी काढलेल्या एका निवेदनात असे म्हटले आहे की, “भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 कलम 163 (1) (2) (3) प्रमाणे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून नागपूर शहरातील परिमंडळ क्रमांक 3 हद्यीतील पोलीस ठाणे कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर या भागास तसेच परिमंडळ 4 मधील सककरदरा, नंदनवन, इमामवाडा या भागात व परिमंडळ 5 मधील यशोधरानगर, कपीलनगर, या परिसरात संचारबंदी (कर्फ्यू) लागू केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा