लाडक्या बहिणी’च्या पैशाने हसतं खेळतं कुटूंब उद्घवस्त, खात्यात 3000 रुपये आले अन्.!!!

0 1,059

लाडक्या बहिणी’च्या पैशाने हसतं खेळतं कुटूंब उद्घवस्त, खात्यात 3000 रुपये आले अन्.!!!

महायुती सरकारकडून निवडणुकीच्या तोंडावर राबवण्यात आलेली लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात गेमचेंजर ठरली. लाडक्या बहि‍णींनी महायुतीला पाठिंबा दिल्याने पुन्हा सत्ता स्थापन करण्यात महायुतीला यश आलं आहे

‘लाडकी बहीण’ योजनेतील मिळणाऱ्या पैशांवरून अनेक वाद झाल्याचं समोर आलं होतं. तसेच कुटुंबात कलह देखील वाढल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. अशातच आता मिळालेले पैसे परस्पर खर्च केल्याने जाब विचारणाऱ्या महिलेला पती आणि सासूने जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

दोन महिन्यांचे पैसे आले अन्…

माढा तालुक्यातील लोणी येथे राहणाऱ्या निशा लोंढे असं मारहाण झालेल्या विवाहितेचं नाव असून, पती धनाजी लोंढे आणि सासू रूपाबाई लोंढे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत. निशा यांना ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत फेब्रुवारी आणि मार्च असे दोन महिन्यांचे पैसे मिळाले होते. मात्र, पतीने हे पैसे परस्पर काढून घेतले.

नवरा आणि बायकोमध्ये वाद

 

माझे लाडक्या बहिणीचे पैसे तुम्ही का काढले? असं पत्नी निशा हिने जाब विचारल्याने नवरा आणि बायकोमध्ये वाद सुरू झाला. यावेळी सासू रूपाबाई लोंढे ही मुलाची बाजू घेत वाद घालत होती. हा वाद वाढत गेल्यानं पती आणि सासूने निशाला जबर मारहाण केली. पाय, गुडघा आणि हातावर कोयत्याने वार केल्याने निशा गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

सासू नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल

 

दरम्यान, निशा लोंढे हिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. माढा पोलीस स्टेशनमध्ये पती धनाजी लोंढे आणि सासू रूपाबाई लोंढे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून हेड कॉन्स्टेबल रोपळे या प्रकरणात तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!