अपघातआपला जिल्हामहाराष्ट्र

शेतामध्येच रोडग्याचा बेत ठरला’ चूल पेटवली..धूर झाला अन् एका महिलेने गमावला जीव.!!!

शेतामध्येच रोडग्याचा बेत ठरला,चूल पेटवली..धूर झाला अन् एका महिलेने गमावला जीव.!!!

अकोला :-

अकोल्याच्या  बार्शीटाकळी तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेतीकाम करणाऱ्या महिलांनी शेतामध्येच रोडगे बनविण्याचा बेत ठरवला होता. महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं.

मात्र त्यातच एका महिलेच्या मृत्यूने गावात खळबळ उडाली आहे. अकोल्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील काजळेश्वर शेत शिवारामध्ये शेतीकाम सुरू असताना महिलांचा रोडगे बनविण्याचा बेत ठरवला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, रोडगे बनविण्यासाठी महिलांनी गौऱ्या पेटविल्या. त्यामुळे परिसरात बराच धूर झाला होता. तर एवढ्यात धुराने झाडावरील मधमाशांचा पोळ फुटला. पाहता क्षणीचं मधमाशा परिसरात पसरल्या. या मशमाशांनी रोडगे बनविण्यासाठी जमलेल्या महिलांवर हल्ला केला. यामध्ये काही महिलांनी ताडपत्रीने स्वतःचा बचाव केला. तर काहींनी पळ काढला

त्यात रेश्मा आतिश पवार यांचे मधमाशांच्या हल्ल्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर मीरा प्रकाश राठोड व दोन लहान मुलं जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. स्थानिक नागरिकांनी जखमींना अकोला शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!