शेतामध्येच रोडग्याचा बेत ठरला,चूल पेटवली..धूर झाला अन् एका महिलेने गमावला जीव.!!!
अकोला :-
अकोल्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेतीकाम करणाऱ्या महिलांनी शेतामध्येच रोडगे बनविण्याचा बेत ठरवला होता. महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं.
मात्र त्यातच एका महिलेच्या मृत्यूने गावात खळबळ उडाली आहे. अकोल्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील काजळेश्वर शेत शिवारामध्ये शेतीकाम सुरू असताना महिलांचा रोडगे बनविण्याचा बेत ठरवला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, रोडगे बनविण्यासाठी महिलांनी गौऱ्या पेटविल्या. त्यामुळे परिसरात बराच धूर झाला होता. तर एवढ्यात धुराने झाडावरील मधमाशांचा पोळ फुटला. पाहता क्षणीचं मधमाशा परिसरात पसरल्या. या मशमाशांनी रोडगे बनविण्यासाठी जमलेल्या महिलांवर हल्ला केला. यामध्ये काही महिलांनी ताडपत्रीने स्वतःचा बचाव केला. तर काहींनी पळ काढला
त्यात रेश्मा आतिश पवार यांचे मधमाशांच्या हल्ल्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर मीरा प्रकाश राठोड व दोन लहान मुलं जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. स्थानिक नागरिकांनी जखमींना अकोला शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे