भडगाव येथे शासकीय विश्रामगृहात राज्यस्तरीय कोळी समाज वधु-वर मेळावा संबंधित नियोजन बैठक संपन्न.!!!

0 95

भडगाव येथे शासकीय विश्रामगृहात राज्यस्तरीय कोळी समाज वधु-वर मेळावा संबंधित नियोजन बैठक संपन्न.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव येथील शासकीय विश्रामगृहात आज दि.२४/२/२०२५ वार सोमवार रोजी वधुवर मेळावा नियोजन बैठक संपन्न झाली.

या वधुवर मेळावा संबंधित नियोजन बैठकीची सुरुवात ही आलेल्या सर्व समाज बांधवांच्या परिचयाने झाली. सर्व बांधवांनी मोठ्या हर्षउल्हासाने आपआपला परिचय सामाजिक कार्याची महती दिली,

विशेष करुन भुसावळ-जळगाव भागातुन आलेले नारायण झगु कोळी यांनी आपला परिचय देऊन त्यांनी आयोजित व यशस्वी केलेल्या केलेल्या वधुवर मेळावा संबंधित माहिती सर्वांना सांगितली. त्यातुन खान्देश मध्ये होणा-या वधुवर मेळावा संबंधित सखोल चर्चा करण्यात आली.समाजाचे चांगले कार्य करणाऱ्यांना अडथळे येतातच पण त्या अडथड्यांना न डगमगता आपले कार्य चालुच ठेवावे असे आव्हान उंबरखेड चे मा.तुकाराम मोरे सरांनी समाज बांधवांना केले.

आज माझी तब्येत बरोबर नसतांना ही मी या बैठकीला उपस्थिती दिली,तसेच नारायण कोळी यांनी समाजाचे कार्य जर यशस्वीपणे पार पाडायचे असेल तर मनापासून कार्य करावे दहा दिवस असे द्या की “आपल्याला घर आहे ना परिवार” तसेच सावळे सर यांनी वधुवर मेळावा काहीही अडचण येवो ते आपण सर्व मिळून यशस्वी करुन घेऊ, भुसावळ (साकेगाव) नारायण झगु कोळी,उंबरखेड (चाळीसगाव) तुकाराम मोरे सर,कजगावचे संजय कोळी, चाळीसगाव गाव चे रघुनाथ भाऊ कोळी यांनीपण योग्य ते सहकार्य करु असे आश्वासन दिले,या यावेळी कोळी महासंघाचे पाचोरा तालुकाध्यक्ष सुनील मोरे, पत्रकार राजेंद्र खैरनार,गिरडचे अनिल सावळे सर, वडजी येथील माजी सरपंच नेहरू कोळी,भडगाव येथील अजय कोळी, सुनील कोळी, समाधान कोळी, तात्या कोळी, दिनेश कोळी, गोपाळ कोळी,किसन कोळी, सुभाष कोळी, धर्मेंद्र कोळी, इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.

 

या समाज बांधवांच्या मोठ्या संख्येने बैठक संपन्न झाली कोळी समाजातील सर्व समाजबांधवांनी तन,मन,धना ने मनापासून सहकार्य करावे.ही नम्र विनंती‌ समाज बांधवाना करण्यात आली, याप्रसंगी जळगाव भुसावळ, पाचोरा भडगाव च्या समाज बांधवांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला,आभार व सुत्रसंचलन मा.तुकाराम मोरे सर यांनी केले व बैठकीची सांगता करण्यात आली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा