सोयाबीन आयातीसाठी अमेरिकेचा भारतावर दबाव; आयात शुल्क कायम ठेवण्याची सोपाची मागणी.!!!
भारताने सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलावरील आयात शुल्क कमी करावे यासाठी अमेरिकेने दबाव वाढवला आहे. भारताच्या सेंद्रीय सोयापेंडवर २८४ टक्के शुल्क लावले आहे. पण भारत सरकारने आयात शुल्कात कपात करू नये.
आयात शुल्क कमी केल्यास अमेरिकेचे स्वस्त सोयाबीन देशात येईल आणि शेतकऱ्यांना फटका बसेल. शिवाय खाद्यतेलात आत्मनिर्भर होण्याचे उद्दीष्ट साध्य होणार नाही, असे सोपाने म्हटले आहे.
भारताने अमेरिकेच्या शेतीमाल आयातीवरील शुल्क कमी करावे, अशी मागणी अमेरिका करत आहे. भारत सरकारही अमेरिकेशी असलेले व्यापारी संबंध कसे टिकवून ठेवता येतील, याची चाचपणी करत आहेत. मात्र भारत सरकारने अमेरिकेतून आयात होणाऱ्या सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलावरील शुल्क कायम ठेवावे, त्यात कपात करु नये, अशी मागणी सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थातने केली आहे. भारताने सोयाबीन आयात शुल्कात कपात केली तर अमेरिकेच्या स्वस्त सोयाबीनची देशात आयात वाढेल आणि सोयाबीनचे भाव पडतील. याचा फटका देशातील १ कोटी सोयाबीन उत्पादकांना बसेल, असेही सोपाने म्हटले आहे.
भारत सोयाबीन उत्पादनात जागतिक पातळीवर पहिल्या ५ देशांमध्ये येतो. भारतात चालू हंगामात विक्रमी १५१ लाख टन सोयाबीन उत्पादन झाले आहे. देशातील सोयाबीन उत्पादन आपली गरज पूर्ण तर करतेच शिवाय सोयाबीन शिल्लकही राहते. शिल्लक सोयाबीन भारताला निर्यात करावे लागते. म्हणजेच देशात सोयाबीनचे अतिरिक्त उत्पादन होते. त्यामुळे भारताला सोयाबीन आयातीची गरज आहे. सरकारने आयात शुल्क कमी करू नये, असेही सोपाने म्हटले आहे.
अमेरिका सोयाबीन उत्पादन आणि निर्यातीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत सोयाबीनची उत्पादकता भारतापेक्षा जास्त आहे. अमेरिकेत हेक्टरी ३० क्विंटल सोयाबीन उत्पादन मिळते तर भारतात केवळ १२ क्विंटल उत्पादन मिळते. अमेरिकेत जीएम सोयाबीनचे उत्पादन होते तर भारतात नॉन जीएम सोयाबीनचे उत्पादन होते. त्यामुळे सरकारने आयात शुल्कात कपात करू नये, असेही सोपाने स्पष्ट केले.
देशात सोयाबीनची उत्पादकता खूपच कमी आहे. अशात भारताने कमी आयात शुल्कात आयातीला परवानगी दिली तर देशातील सोयाबीन शेतीला मोठा फटका बसेल. भारताच्या खाद्यतेल आत्मनिर्भरतेच्या उद्दीष्टालाही हरताळ फासला जाईल. आधीच अमेरिकेच्या आयातीवर जागतिक व्यापर संघटनेच्या दरापेक्षा कमी शुल्क आहे. भारत आधीच खाद्यतेलात ६० टक्के आयातीवर अवलंबून आहे. त्यात आयात शुल्क कमी केल्यास आणखी आयात वाढून देशातील उत्पादन कमी होईल, अशी भीतीही सोपाने व्यक्त केली.
मूल्यवर्धीत उत्पादनांचे शुल्क कमी करा
अमेरिका आणि बारत दोन्ही देशांनी सोया मूल्यवर्धीत आयसोलेट्स आणि काॅन्सट्रेट्समध्ये आयात शुल्क कमी करण्यास हरकत नाही. ही उत्पादने बाजारात थेट सोयाबीनसोबत स्पर्धा करत नाही किंवा यांच्या दराचा परिणाम थेट सोयाबीनच्या भावावर होत नाही. यामुळे भारताच्या अन्न प्रक्रिया क्षेत्रालाही चालना मिळेल. याचा फायदा दोन्ही देशांना होईल, असेही सोपाने म्हटले आहे.
भारताच्या सोयापेंडवर शुल्क
भारत अमेरिकेच्या सोयाबीन आणि सोयापेंडवर जास्त आयातशुल्क लावतो. त्यामुळे अमेरिकेनेही भारताच्या सेंद्रीय सोयाबीन पेंडेवर आयात शुल्क वाढवले आहे. आधी अमेरिकेच्या सोयापेंडेवर १२ ते १५ टक्के आयातशुल्क लावत होते. मात्र आता अमेरिकेने जवळपास २८४ टक्के शुल्क लागू केले आहे. भारतावर दबाव वाढवण्यासाठी अमेरिकेने आायत शुल्कात मोठ्या प्रमाणात वाढ केली.