“शिव उद्योग संघटना” आणि “शिवसेना उद्योग व रोजगार विकास मंच” यांचा ऐतिहासिक निर्णय: पदाधिकाऱ्यांना मानधन आणि रोजगाराची हमी
“शिव उद्योग संघटना” आणि “शिवसेना उद्योग व रोजगार विकास मंच” यांचा ऐतिहासिक निर्णय: पदाधिकाऱ्यांना मानधन आणि रोजगाराची हमी
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : “शिव उद्योग संघटना” आणि “शिवसेना उद्योग व रोजगार विकास मंच” यांच्या संयुक्त बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बाळासाहेब भवन, मंत्रालय समोर, नरिमन पॉइंट येथे झालेल्या या बैठकीत दोन्ही संघटनेचे अध्यक्ष दीपक विठ्ठल काळीद आणि शैलेश जायसवाल यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
शिवसेना पक्षाच्या माध्यमातून निःस्वार्थ समाजसेवा करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना आता मानधन स्वरूपात उत्पन्नाचं साधन देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे पदाधिकारी अधिक जोमाने सामाजिक कार्य करत असतानाच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सहज करू शकतील.
बैठकीत केवळ मानधनच नव्हे, तर सर्व कार्यकर्त्यांना विविध व्यवसाय आणि रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन देखील करण्यात आले. या उपक्रमामुळे संघटनेचे पदाधिकारी आपल्या भागातील बेरोजगारांना योग्य दिशा दाखवू शकतील आणि अधिकाधिक लोकांना स्वावलंबी बनवण्यासाठी मदत करू शकतील.
*”कोणताही बेरोजगार रिकाम्या हाताने परत जाणार नाही!”*
या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांनी शपथ घेतली की त्यांच्याकडे येणारा कोणताही बेरोजगार यापुढे रिकाम्या हाताने परत जाणार नाही. रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी संघटना सतत कार्यरत राहणार असून, गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.
या महत्वपूर्ण बैठकीला “शिव उद्योग संघटना” आणि “शिवसेना उद्योग व रोजगार विकास मंच” चे वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोजगार आणि उद्योगवाढीच्या दिशेने संघटना अधिक सक्रिय भूमिका बजावेल, असा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
या निर्णयामुळे राज्यातील बेरोजगार आणि समाजसेवकांना मोठा दिलासा मिळणार असून, रोजगारनिर्मितीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.