गणेश गल्ली चौक परिसरात भव्य स्वच्छता मोहीम – नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : गणेश गल्ली चौक परिसरात वाढता कचरा, दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि साथीचे रोग या समस्यांवर उपाय म्हणून ८ मार्च रोजी सकाळी १० वाजता भव्य स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेला नागरिकांसह महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या मोहिमेद्वारे कचऱ्याचे ढीग हटवण्यात आले, रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले आणि डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणांची विशेष स्वच्छता करण्यात आली. स्थानिक रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
या अभियानात सहाय्यक अभियंता श्रीकांत राठोड, राजेश गोसावी (सुपरवायझर, एस डब्ल्यू एम), पूजा साटम (ज्युनिअर सुपरवायझर, एस डब्ल्यू एम), महेंद्र मारू (मुकादम, एस डब्ल्यू एम – मेंटेनन्स), जितेंद्र साळुंखे (पीसीओ), रवींद्र जिमन, श्री. कांबळे आणि लालबाग विभागातील कचरा व्यवस्थापन कर्मचारी यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च रोजीही परिसरात विशेष स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि परिसर स्वच्छतेचा संदेश दिला.
या मोहिमेच्या यशस्वी आयोजनासाठी महेंद्र मंदाकिनी जगन्नाथ तावडे (प्रशासन व उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, दक्षिण मुंबई जिल्हा) यांनी विशेष पुढाकार घेतला. “परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी ही मोहीम केवळ एक दिवसापुरती मर्यादित न राहता सातत्याने राबवली जावी,” असे मत त्यांनी व्यक्त केले. या अभियानामुळे गणेश गल्ली चौक परिसर अधिक स्वच्छ आणि आरोग्यदायी झाला असून, नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला आहे.