राजकीयविशेष

आम्हाला एक खून माफ करा” रोहिणी खडसेंनी राष्ट्रपतींना पत्र लिहीत का केली अशी मागणी.?

आम्हाला एक खून माफ करा”रोहिणी खडसेंनी राष्ट्रपतींना पत्र लिहीत का केली अशी मागणी.?

आज जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे एक मागणी केली आहे.

सर्व्हेनुसार भारत सर्वात असुरक्षित देश

या सर्व्हेमध्ये महिलांसाठी असुरक्षित असलेल्या जगातील विविध देशांचा उल्लेख केला आहे. या सर्व्हेनुसार आशिया खंडात भारत सर्वात असुरक्षित देश असल्याचे म्हटले गेले आहे. महिलांचे अपहरण, महिला बेपत्ता होण्याचे प्रकार, घरगुती हिंसाचार आणि अन्य गंभीर विषयांचाही समावेश आहे. त्यामुळे आम्हाला एक खून माफ करा, अशी आम्ही समस्त महिलांच्या वतीने मागणी करतो.

https://x.com/Rohini_khadse/status/1898207510227558827?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1898207510227558827%7Ctwgr%5Eab96a0af4b1b0fb12773667d281e58e0837f78cd%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

हीच जागतिक महिला दिनाची भेट समजू

अत्याचारी मानसिकतेचा, बलात्कारी प्रवृत्तीचा, निष्क्रिय असलेल्या कायदा सुव्यवस्थेचा आम्हाला खून करायचा आहे. महोदया, आपल्या राज्यावर, देशावर संकट आले म्हणून महाराणी ताराराणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तलवार उपसली होती. मग आमचा समाज सुधारण्यासाठी आम्ही का मागे राहावे. आमच्या मागणीचा यथोचित विचार करून आपण आमची मागणी मान्य कराल ही अपेक्षा करते. हीच तुमच्याकडून आम्हाला जागतिक महिला दिनाची भेट समजू, असे रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे.

12 वर्षीय शाळकरी मुलीवर लैगिंक अत्याचार

दरम्यान, मुंबईतील जोगेश्वरी पूर्व परिसरात एका 12 वर्षीय शाळकरी चिमुरड्या मुलीवर पाच नराधमांनी लैगिंक अत्याचार केल्याची घटना घडली होती. पीडित मुलगी जोगेश्वरीत नातेवाईकांसोबत राहते. मात्र 24 फेब्रुवारी रोजी ती बेपत्ता झाली होती. मुलगी एकटी असल्याचं बघून हे नराधम मुलीला त्यांच्या संजय नगर जोगेश्वरी येथील घरी नेले आणि या नराधमांनी मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर 27 फेब्रुवारीला पीडित मुलगी रेल्वे पोलिसांना दादर स्थानकात सापडली. पोलिसांच्या चौकशीत तिच्यावर जोगेश्वरी परिसरात लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती मिळाली. ज्यानंतर पाच जणांना पोलिसांनी अटक करण्यात आली.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!