मोठी बातमी- एप्रिलमध्ये प्रत्येक कुटुंबाची आर्थिक गणना होणार सर्वेची जबाबदारी कोणाकोणावर.?

0 483

मोठी बातमी- एप्रिलमध्ये प्रत्येक कुटुंबाची आर्थिक गणना होणार सर्वेची जबाबदारी कोणाकोणावर.?

पुणे :-

राज्यात प्रत्येक दहा वर्षांनी लोकसंख्येच्या अनुषंगाने प्रत्येक कुटुंबाची आर्थिक जनगणना केली जाते. पण 2011 नंतर आतापर्यंत जनगणना झालेली नाही. राज्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता प्रत्येक कुटुंबाची आता एप्रिलमध्ये आर्थिक गणना होणार आहे.या आर्थिक गणनेतून प्रत्येक व्यक्तीच्या उत्पन्नाच साधन त्याचबरोबर तो उद्योग काय करतो तसेच व्यवसाय,नोकरी काय करतो याबाबतची माहिती संकलित केली जाणार आहे.

ही आर्थिक गणना अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविका त्याचबरोबर शिक्षकांची ही मदत घेऊन केली जाणार आहे. प्रत्येक कुटुंबाच्या आर्थिक गणनेचा हा सर्वे साधारणतः दोन ते अडीच महिने चालणार आहे.

 

प्रत्येक कुटुंबाची आर्थिक गणना करण्यासाठी अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविकांची मदत घेतली जाणार असून प्रत्येकी 300 कुटुंबाचे टार्गेट देऊन हा सर्वे पूर्ण केला जाणार आहे. साधारणतः एप्रिल ते जून या तीन महिन्यात ही गणना होणार असल्याची माहिती जिल्हा सांख्यिकी कार्यालयाने दिली आहे. सोलापूर सह राज्यातील प्रत्येक कुटुंबीयांचा सर्वे होणार आहे. या सर्वेसाठी मनुष्यबळ कमी पडल्यास शिक्षक संघटनाशी देखील चर्चा केली जाणार आहे. दरम्यान केंद्र सरकारकडून त्या संदर्भात राज्य सरकारला पत्रव्यवहार करण्यात आला असून महाराष्ट्रात हा सर्वे सुरू करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

 

या आर्थिक गणेनेच्या सर्व्हेतुन कोणत्या वयोगटातील व्यक्ति, तरुण -तरुणी रोजगार, व्यवसाय,नोकरी करतात किंवा त्या करत नाहीत हे स्पष्ट होणार आहे. त्याचबरोबर वाढत्या लोकसंख्येचा आकडा ही यातून समोर येणार आहे. त्यानुसार कोणत्या घटकासाठी शासन स्तरावर उपाययोजना करता येतील हे निश्चित केले जाणार आहे. दरम्यान राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील सुमारे दहा लाख कुटुंबाची आर्थिक गणना केली जाणार असून त्याचे नियोजन सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा