पाचोरा शहरातील आशीर्वाद ड्रीम सिटी येथे एका विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या.पतीसह सासू विरोधात पोलिसात गुन्हा दाखल.!!!

0 51

पाचोरा शहरातील आशीर्वाद ड्रीम सिटी येथे एका विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या.पतीसह सासू विरोधात पोलिसात गुन्हा दाखल.!!!

पाचोरा प्रतिनिधी :-

शहरातील आशीर्वाद ड्रीम सिटी येथे विवाहितेने सासरच्या जाचास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली असून मृत विवाहितेचे नाव वैशाली पाटील (वय-४३) असे आहे. सदर घटनेप्रकरनी मृत विवाहितेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात मृत विवाहितेचा पती व सासू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत पाचोरा पोलिसात मृत विवाहितेचा भाऊ गजानन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, “माझी बहीण वैशाली लग्नानंतर सहा ते सात महिने उत्तम राहिली. परंतु त्यानंतर तिच्या पती अनिल पाटील आणि सासू छबाबाई पाटील यांनी तिच्या चारित्र्यवर संशय घेण्यास सुरवात केली.

‘तू मोबाईलवर कोणाशी बोलतेस? तुझे काही संबंध आहे का?’ असे प्रश्न विचारत तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला याविषयी मृत वैशालीने तिच्या भावाला “सासरच्या जाचामुळे मी त्रस्त आहे.असे ही कळविले होते” भावाने तिला सावध राहण्यासाठी सांगितले होते की, “तू काही टेन्शन घेऊ नकोस, टोकाचे पाऊल उचलू नकोस.” परंतु

२ मार्च चा सायंकाळी फिर्यादीला त्याचा भाचा रोहित पाटील याने फोन करून आईने फाशी घेतली आहे.”

अशी माहिती दिल्याने या माहितीवरून भावाने तत्काळ पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलीसांना माहीती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि पंख्याला लटकलेला विवाहितेचा मृत देह खाली उतरवून ॲम्बुलन्सच्या सहाय्याने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला या ठिकाणी डॉक्टरांनी मृत घोषित केले.

सदर घटने प्रकरणी मृत विवाहितेचा भाऊ गजानन पाटील यांनी पाचोरा पोलीसात दिलेल्या फिर्याद वरून रविवारी रात्री मृत विवाहितेचा पती अनिल पाटील व सासू छबाबाई पाटील या दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे असून आरोपी अनिल पाटील यास सोमवारी अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा