पारोळ्याच्या जवानाला श्रीनगर येथे वीरमरण.!!!

0 371

पारोळ्याच्या जवानाला श्रीनगर येथे वीरमरण.!!!

 

पारोळा प्रतिनिधी :-

पारोळा – येथील शेवडी गल्लीतील रहिवाशी सीआरपीएफ जवान जितेंद्र देविदास चौधरी यांना श्रीनगर येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले.त्यांच्या निधनाने संपूर्ण शेवडी गल्लीसह शहर परिसरात शोककळा पसरली आहे.त्यांच्यावर आज बुधवारी ५ रोजी दुपारी कुटीर रुग्णालयासमोरील स्टेडियमवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

 

१०२ आरएएफ बी/११७ बटालियन मधील सीआरपीएफ जवान जितेंद्र चौधरी हे श्रीनगर येथे कर्तव्य बजावत होते. मंगळवारी ४ रोजी अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन अकस्मात निधन झाले. श्रीनगर येथून त्यांचे पार्थिव पुण्यात आणण्यात आले,तेथून पार्थिव हे पारोळा येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले.आज बुधवारी जवान जितेंद्र चौधरी यांची अंत्ययात्रा शेवडी गल्ली येथून निघुन भवानी चौक,श्रीराम चौक,रथ चौक,क्रांती चौक,वाणी मंगल कार्यालय,आझाद चौक मार्गे महामार्गालगत कुटीर रुग्णालयासमोरील स्टेडियमवर दुपारी शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात त्यांचावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

जितेंद्र चौधरी यांच्या पश्चात तीन भाऊ,एक बहीण,दोन लहान मुली (अडीच वर्षांची व आठ महिन्यांची) असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा