गिरणा नदी पात्रातुन अवैध वाळू चोरी-अवैध वाळू चोरी करून वाहतुक करतांना दहा टायरी डंपर जप्त.!!!
कजगाव येथे जळगांव स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची कारवाई
गिरणा नदी पात्रातुन अवैध वाळू चोरी-अवैध वाळू चोरी करून वाहतुक करतांना दहा टायरी डंपर जप्त.!!!
कजगाव येथे जळगांव स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची कारवाई
भडगाव प्रतिनिधी :-
तालुक्याला वरदान ठरलेल्या गिरणा माई चे वस्त्रहरण करून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दहा टायरी डंपर वर आज मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे यांच्या पथकाने दहा टायरी डंपर कजगाव जवळ पकडले असून हे डंपर भडगाव पोलीस स्टेशनच्या आवारात जमा करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. ०३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पो.हे.कॉ.लक्ष्मण पाटील,पो. काँ.जितेंद्र पाटील,पो.कॉ.भूषण पाटील,पो.कॉ.प्रमोद ठाकूर,अमजद खान,आदींचे पथक जळगाव जिल्ह्याच्या गस्तीवर असताना भडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील कजगाव जवळ १) रघुनंदन एकनाथ पाटील (मालक),हिरामण राजू सोनवणे (चालक) याच्या ताब्यात एक दहा टायर डंपर जप्त करण्यात आले .या डंपर मध्ये ६ ब्रास वाळू मिळून आली. हे वाहन जप्त करून भडगाव पोलीस स्टेशन च्या आवारात लावण्यात आले.याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
याबाबत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे या कारवाई बाबत सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे अशीच कारवाई सतत सुरू ठेवून भडगाव तालुक्यात अवैध वाळू वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येत आहे.