जळगावराजकीय

निवडणूकीत भाजपा दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी कॉग्रेस चे धरणे आंदोलन.!!!

निवडणूकीत भाजपा दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी कॉग्रेस चे धरणे आंदोलन.!!!

पाचोरा प्रतिनिधी :-

भाजपा ने निवडणूकीत शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते त्याची आठवण करून देण्यासाठी कॉग्रेस ने एकदिवसीय धरणे आंदोलन केले शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, सोयाबीन, कापूस, तुर, व हरभरा, या पिकांची शासनाने त्वरित खरेदी करावी, खुल्या बाजारात कमी किमतीत विकलेल्या सोयाबीन, कापूस, तूर हरभरा या पिकांना भावांतर योजना जाहीर करावी, शेतकऱ्यांना लागणारे खते बियाणे कीटकनाशक व अवजारे यांना जीएसटी मुक्त करावे, पाचोरा तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी इतर आणि शहरातील वीज ग्राहकांना वीज मंडळाने जे स्मार्ट मीटर बळजबरीने बसवणे सुरू केले आहे ते मीटर बसवणे त्वरित बंद करावे अशा प्रमुख मागण्या घेऊन एक दिवशीय धरणे आंदोलन कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी भाजप सरकार ला आठवण देण्यासाठी च्या घोषणा देण्यात आल्या.

 

यावेळी नायब तहसीलदार विनोद कुमावत यांना निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रदीपराव पवार, तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, प्रदेश प्रतिनिधि शेख ईस्माइल शेख फकिरा, जिल्हा सरचिटणीस प्रताप पाटील, जिल्हा सचिव राजेंद्र महाजन, इरफान मनियार, युवक प्रदेश सरचिटणीस आशुतोष पवार, मनोहर महाले, महीला सरचिटणीस कुसुम पाटील, शरीफ शेख, शंकर सोनवणे, उबाठा चे अरुण पाटील, अॅड के एस पाटील, आंनद अहीरे, नवल भोई, युवक काँग्रेस अध्यक्ष कल्पेश येवले, सुनील पाटील, मुबारक शेख, प्रकाश भिवसने, साहेबराव पाटील, दशरथ पाटील, रामसिंग जाधव, रविंद राठोड, चेतन बोदवडे आदी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!