रमजाननिमित्त भडगाव शहरातील येथील बाजारपेठ सज्ज.!!!

0 25

रमजाननिमित्त भडगाव शहरातील येथील बाजारपेठ सज्ज.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

रमजान पर्वाला रविवारी (ता. २) सुरवात होईल. महिनाभर मुस्लीम बांधवांचे उपवास असणार आहेत. येथे अनेकांच्या दिनचर्या देखील बदलणार आहे.

रमजानमध्ये उपवास सोडताना मुस्लीम बांधव मोठ्या प्रमाणात फळांचा वापर करतात यात प्रामुख्याने टरबूज, खरबूज, केळी, द्राक्ष, पपई, खजूर यांचा समावेश असतो.

सायंकाळी साडेपाचनंतर या बाजारांमध्ये गर्दी होते.ग्रीन पार्क, बस स्टॅन्ड आणि शहरातील जामा मस्जिद च्या रस्त्यावर भरणाऱ्या बाजारात गर्दी असते.शहरातील माध्यभागात असल्यामुळे या ठिकाणी गर्दी असते 

यावर्षी कच्ची केळी १९०० रुपये क्विंटलने विकली जात आहेत. त्यामुळे गेल्या वर्षी ३० रुपये मिळणारी केळी सध्या ५० रुपये डझनपर्यंत विकली जाऊ शकते. टरबूज २० रुपये किलोने तर खरबूज ५० रुपये किलोने विक्री होणार असल्याचे येथील एका व्यापाऱ्यांनी सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा