भडगाव येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती उत्सव समितीची बैठक संपन्न.!!!

जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी सुशील सोनवणे यांची निवड

0 13

भडगाव येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती उत्सव समितीची बैठक संपन्न.!!!

 

जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी सुशील सोनवणे यांची निवड

भडगाव प्रतिनिधी :-

तालुक्यासह शहरात सालाबाद प्रमाणे दरवर्षी १४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव साजरा करण्यात येतो या निमित्तान आज दि.१ मार्च रोजी संध्याकाळी भडगांव- टोणगांव येथील नालंदा बौद्ध विहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती ची बैठक पार पडली या बैठकीत जयंती उत्सव समिती अध्यक्ष पदी सुशिल प्रकाश सोनवणे यांची सर्वानुमते अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

 

याबाबत अधिक माहिती अशी की,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव संपुर्ण भारता सह महाराष्ट्रात साजरा होत असतो आज त्यांच्या १३४ व्या सार्वजनिक जयंती उत्सवा समिती ची बैठक नालंदा बुद्ध विहार टोणगाव भडगांव येथे घेण्यात आली. या वेळी जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुशिल सोनवणे यांची सर्वानुमते एकमताने अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती कार्यकारणी पुढील प्रमाणे अध्यक्ष: सुशील प्रकाश सोनवणे,

उपाध्यक्ष: सिद्धार्थ रमेश सोनवणे,

सचिव: शशिकांत तापीराम मोरे,

खजिनदार: तुषार अनिल शिरसाठ आदींची जयंती उत्सव समिती बैठकित एकमताने निवड करण्यात आली असून याबाबत नवनियुक्त जयंती उत्सव समिती पदाधिकारी चे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा