IMG 20260813 WA1607

लोण पिराचे येथे रस्त्याच्या मधोमध जीवघेणा खड्डा; नागरिकांचा जीव टांगणीला चार महिन्यांपासून प्रशासक; विकासकामांकडे दुर्लक्ष, नागरिकांमध्ये संताप.!!!

59 / 100 SEO Score

लोण पिराचे येथे रस्त्याच्या मधोमध जीवघेणा खड्डा; नागरिकांचा जीव टांगणीला चार महिन्यांपासून प्रशासक; विकासकामांकडे दुर्लक्ष, नागरिकांमध्ये संताप

भडगाव ता. प्रतिनिधी आमीन पिंजारी

:तालुक्यातील लोण पिराचे येथे गेल्या चार महिन्यांपासून प्रशासक कार्यरत असून, गावातील विकासकामांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. गावातील मुख्य रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून मोठमोठे खड्डे पडले असून, रस्त्याच्या अगदी मध्यभागी पडलेला भला मोठा खड्डा नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे.

या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा सुरू असते. मात्र रस्त्याची दुरवस्था झाल्याने वृद्ध नागरिक, महिला, लहान मुले तसेच दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी रस्त्याच्या मधोमध असलेला खड्डा वाहनचालकांच्या लक्षात न आल्यास अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गावात रस्ते, स्वच्छता तसेच इतर मूलभूत सुविधांबाबत अनेक समस्या निर्माण झाल्या असून, प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रस्त्याच्या मध्यभागी पडलेला जीवघेणा खड्डा तातडीने बुजवून रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

संबंधित अधिकारी व प्रशासनाने कोणतीही दुर्घटना घडण्याची वाट न पाहता तातडीने या समस्येची दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

1Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top