केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत धक्कादायक प्रकार.

0 1,304

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत धक्कादायक प्रकार

 

जळगांव प्रतिनिधी :-

भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची टवाळखोरांनी छेड काढल्याची घटना समोर आली आहे. जळगावमधील या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. राज्यात आणि देशात महिला सुरक्षेचा मुद्दा सातत्याने ऐरणीवर येत आहे.

या घटनेने महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मुक्ताईनगर येथील यात्रा महोत्सवात काही टवाळखोर तरुणांनी रक्षा खडसे यांच्या मुलीसह अन्य मुलींची छेड काढली. रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत असलेल्या सुरक्षारक्षकाने टवाळखोर मुलांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र टवाळखोरांनी सुरक्षारक्षकासही धक्काबुक्की केली.

छेडछाड करणाऱ्या चार मुलांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रक्षा खडसे यांच्या मुलीसोबतच इतरही मुलींची छेडछाड या मुलांनी केली असल्याचे रक्षा खडसे यांनी म्हटले आहे. ज्या मुलाने छेड काढली, त्याच्यावर अगोदरच चार गुन्हे दाखल आहेत.

या घटनेबद्दल बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, मुक्ताईनगर मधील यात्रेत घडलेला प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे, हे टवाळखोर नसून तर ते गुंड आहेत, त्यांच्या विरोधात आधी सुद्धा काही गुन्हे दाखल आहेत, या मुली ज्यावेळेस यात्रेत हजर होत्या त्यावेळेस पोलीसही तिथे हजर होते, पोलिसांनी त्या गुंडांना अडवण्याचा प्रयत्न केला परंतु त्या गुंडांनी पोलिसांनाच मारहाण केली, पोलिसांना शिवीगाळ ही केली. त्या पोलिसांनी या गुंडांवर 353 चा गुन्हा देखील दाखल केलेला आहे, हा एक प्रश्न निवळ माझ्या घरामध्ये घडला असा नाही, हा एक सामाजिक प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये अशा अनेक घटना घडत आहेत, अनेक घटनांची नोंद होत नाही, किंवा महिला त्या ठिकाणी तक्रार करायला पुढे येत नाहीत, तक्रार न झाल्यामुळे अशी प्रकरण उघडकीस येत नाहीत, या ठिकाणी जो प्रकार घडला यासाठी रक्षा खडसेंची मुलगी स्वतः तक्रार करायला पुढे आली, हे फार मोठा आहे नाहीतर मुली सहसा तक्रार करायला पुढे येत नाहीत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

मुक्ताईनगर मतदारसंघांमध्ये गेल्या चार-पाच वर्षात जी गुंडगिरी वाढली आहे, या गुंडगिरी विषयी मी अनेक वेळा विधान परिषदेमध्ये वारंवार आवाज उठवला परंतु याकडे लक्ष दिले गेले नाही अशीही प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा