तरुणीचा आत्महत्येप्रकरणी टोळीच्या तरुणास १० वर्षांचा कारावास.!!!
पारोळा प्रतिनिधी :-
पारोळा – लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला लग्नास नकार दिल्याने आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तालुक्यातील टोळी येथील नराधमास अमळनेर न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावास आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
टोळी येथील आरोपी शिवनंदन शालिक पवार उर्फ दादू (वय ३६) याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वेळोवेळी जबरी लैंगिक संबंध प्रस्थापित केले.पीडितेने लग्न करण्यास सांगितल्यावर शिवनंदन याने नकार दिल्याने पीडितेने व्यथित होऊन
आत्महत्या केली होती.ही घटना ८ नोव्हेंबर २०२० रोजी घडली होती.याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात शिवनंदन विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, बलात्कार आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी त्याला अटक केली होती.तेव्हापासून शिवनंदन हा जेलमध्येच होता.अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सी व्ही पाटील यांच्यापुढे या खटल्याचे कामकाज सुरू होते.यात सरकारी वकील आर बी चौधरी यांनी एकूण २६ साक्षीदार तपासले.पीडितेने मृत्यूपूर्वी आपली आई आणि बहिणीला घटना कथन केली होती.त्यांचे तसेच पोलिसांचे व वैद्यकीय अधिकारी आर के गढरी यांनी दिलेली साक्ष ग्राह्य धरून शिवनंदन पवार यास न्यायाधीश सी व्ही पाटील यांनी भादवि कलम ३७६ प्रमाणे १० वर्षे सश्रम कारावास आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.तर इतर कलमातून आरोपीला निर्दोष मुक्त केले.यासाठी पैरवी
अधिकारी सहायक फौजदार उदयसिंग सांळुके,पोहेकॉ पु शा वाल्डे,पोहेकॉ प्रमोद पाटील,पोकॉ भरत इशी,राहुल रणधीर यांनी सहकार्य केले.