श्री बालाजी संकुलात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा.!!!

0 122

श्री बालाजी संकुलात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा.!!!

 

पारोळा प्रतिनिधी :-

पारोळा – येथे श्री बालाजी विद्याप्रबोधिनी मंडळ संचलित सौ एम यू इंग्लिश मिडीयम स्कूल व प्राथमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा झाला.प्रारंभी देवी सरस्वती व सर सी व्ही रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून शाळेचे विज्ञान शिकविणारे शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यानिमित्त प्राथमिक विद्यालयात शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित केले होते.फीत कापून प्रदर्शनाची सुरुवात झाली.त्यात १ ली ते ७ वी पर्यंतचा १४५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम रित्या मॉडेल बनवून त्यांचे सादरीकरण केले.परीक्षण अर्चना भावसार, परेश जैन यांनी केले.या कार्यक्रमाचे नियोजन विज्ञान मंडळ प्रमुख सुजित कंसारा, स्वाती पाटील व प्रशांत घोडसे यांनी पाहिले.सूत्रसंचालन धनेश पाठक यांनी केले.

 

तसेच सौ एम यू करोडपती इग्लीश मिडीयम स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सहावी,सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली त्यात विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.प्राचार्या स्वाती बलखंडे यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान व तंत्रज्ञान या विषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले.शिक्षिका अपूर्वा पाटील यांनी विद्यार्थ्यांना सर सी व्ही रमण यांच्या विषयी माहिती दिली.सूत्रसंचालन पल्लवी बाविस्कर यांनी केले.यावेळी संस्थाध्यक्ष यु एच करोडपती, सचिव डॉ सचिन बडगुजर,सदस्य डॉ चेतन करोडपती,

मुख्याध्यापक हेमंतकुमार पाटील,प्रदीप भावसार आदी शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा