व्यंकटेश विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा.!!!
पारोळा प्रतिनिधी :-
पारोळा – येथील श्री व्यंकटेश माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.डॉ सी व्ही रमण यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक उध्दव पाटील यांनी केले.यावेळी विद्यालयाचे विज्ञान शिक्षक सुनिल शामनाणी यांनी विद्यार्थ्यांना डॉ सी व्ही रमण यांचा रमण इफेक्ट यासह अन्य शोध व त्यांचा कार्याची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली व प्रत्येक गोष्टीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असल्याचे सांगितले.विद्यार्थ्यांनी विज्ञानावर आधारित गोष्टींवर कथन केले.सूत्रसंचालन शुभांगी पाटील यांनी केले.
आभार सुनिता राठोड यांनी मानले.कार्यक्रम यशस्वितेसाठी मुख्याध्यापक उध्दव पाटील,सुनिल शामनाणी,राहुल सुर्यवंशी,योगेश पारधी, शुभांगी पाटील,सुनिता राठोड, कविता पाटील,शुभम पाटील, रामदास दाभाडे,शरद देवरे,विरेंद्र पवार,अतुल मराठे यांनी परिश्रम घेतले.