पारोळा बस स्थानकात मराठी भाषा गौरव दिवस साजरा.!!!
पारोळा प्रतिनिधी :-
पारोळा – येथील बस स्थानकात मराठी भाषा गौरव दिवस साजरा करण्यात आला.या निमित्त पद्मभूषण कुसुमाग्रज वि वा शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन बस स्थानक प्रमुख सी एम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.राजभाषा मराठी गौरव दिनानिमित्त माहिती देण्यात आली.यावेळी वाहतूक नियंत्रक दिलीप पाटील,अनिल बडगुजर, अमित पाटील,संदीप काटे, सुनील चांगारे,डीगंबर शिंदे,उमेश पाटील,रामदास चौधरी,योगिता बोरसे,किरण खारोटे,अण्णा अमृतकर आदी उपस्थित होते.