श्री बालाजी विद्यालयात राजभाषा मराठी दिन साजरा.!!!
पारोळा प्रतिनिधी :-
येथील श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचलित प्राथमिक विद्यालयात राजभाषा मराठी दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष यु एच करोडपती तर प्रमुख पाहुणे म्हणून सचिव डॉ.सचिन बडगुजर,संचालक डॉ चेतन करोडपती,मुख्याध्यापक हेमंतकुमार पाटील,सुलभा पाटील,ज्योती सोनार,संगीता मोटे,राधिका बडगुजर उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते मराठी साहित्य,कादंबरी,ग्रंथ यांचे पूजन करण्यात आले.त्यानंतर ग्रंथ दिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी वाचनालयातील मराठी साहित्य,कादंबरी,ग्रंथ पुस्तकांचे प्रदर्शन ठेवण्यात आले. यावेळी रामद्वारा ग्रुप जळगाव अंतर्गत बालसंस्कार,व्यसनमुक्ती व ध्यान सत्संग या विषयावर सुलभा पाटील आणि सहकारी यांनी व्यसन का करू नये, व्यसनामुळे होणारे दुष्परिणाम व नुकसान याविषयी माहिती दिली तर “राम”जप कसा करावा यावर मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन धनेश पाठक प्रास्ताविक रेखा बडगुजर यांनी केले.आभार कविता कापूरे यांनी मानले.