टायगर स्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिनासह बक्षीस वितरण.!!!

0 40

टायगर स्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिनासह बक्षीस वितरण.!!!

 

पारोळा प्रतिनिधी :-

 

पारोळा – टायगर इंटरनॅशनल स्कूल येथे मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात अभिमानाने साजरा करण्यात आला.तसेच स्कूलमध्ये आयोजीत विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले.

कार्यक्रमात वकील संघाचे माजी अध्यक्ष तथा खुला विचार मंचचे अड तुषार पाटील,महाळपूर सरपंच तथा बाजार समिती सभापती सुधाकर पाटील,माजी उपनगराध्यक्ष दिपक अनुष्ठान, माजी नगरसेवक संजय पाटील, माजी नगरसेवक अरुण चौधरी, माळी समाज अध्यक्ष कैलास महाजन,रुग्णसेवक ईश्वर बाबा ठाकूर,अभियंता गणेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी देवी सरस्वती,वि वा

शिरवाडकर यांच्या प्रतिमांचे पूजन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा जागर घालण्यात आला.विद्यार्थ्यांना मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व विशद करण्यात आले तर विद्यार्थ्यांनी विविध मराठी चारोळ्या,कविता आणि नाट्य सादरीकरण करत मराठी भाषेची गोडी अनुभवली. दरम्यान शिव जन्मोत्सवदिनी आयोजित विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष रविंद्र पाटील, संचालिका रुपाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. सूत्रसंचालन मनीषा नंदूरबारे पाटील यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक पी एस पाटील,अजीम शेख, उपप्राचार्य कविता सूर्यवंशी, विभाग प्रमुख नम्रता बेडिस्कर, वृषाली पाटील,क्लार्क श्रीकांत खैरनार आदींनी परिश्रम घेतले.

दरम्यान मराठी भाषा गौरव दिन हा सुप्रसिद्ध कवी,

साहित्यिक वि वा शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.तर काही महिन्यांपूर्वीच केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान केल्याने मराठी भाषेच्या गौरवात अधिक वाढ झाली आहे.

पाणपोईचे उद्घाटन

उन्हाची वाढती तीव्रता पाहता टायगर इंटरनॅशनल स्कूलतर्फे गरजूंसाठी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पाणपोई चे उद्घाटन करण्यात आले.सदर शाळा ही मुख्य रस्त्यावर असल्याने या पाणपोईचा फायदा परिसरातील नागरिकांसह वाहनधारक, गुराख्यांना देखील होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा