शिवशाही बस चालकाचा जबाव नोंदवला, आरोपीबाबत धक्कादायक खुलासा.!!!
पुणे :-
मंगळवारी (25 फेब्रुवारी) पहाटे पुण्याच्या स्वारगेट एसटी डेपोत उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. दत्तात्रय गाडे या नराधमाने तरुणीला शिवनेरी बसमध्ये नेऊन तिच्यावर जबरदस्ती केली.
ही घटना आज (26 फेब्रुवारी) उघडकीस आल्यानंतर पुण्यातील सामाजिक संघटनांसह विरोधक कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधताना दिसत आहेत. या घटनेप्रकरणी आता ज्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्करा झाला, त्या बस चाकलाचा जबाब नोंदवण्यात आला आहे. बस चालकाने आरोपीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.
शिवशाही बस अत्याचार प्रकरणी महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. याचपार्श्वभूमीवर स्वारगेटच्या एसटी डेपो व्यवस्थापनामधील काही जणांची चौकशी होण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधी ज्या शिवशाही बसमध्ये बलात्कार झाला, त्या बसच्या चालकाचा जबाव वरिष्ठांनी नोंदवून घेतला आहे. बस चालकाने आपल्या जबावात म्हटले की, मी त्या बसचा वाहक आहे. स्वारगेट ते सोलापूर (एच 06 BW 0319) ही शिवशाही बस विनावाहक (कंडक्टर) होती. मी मंगळवारी पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी बसला स्वारगेट आगारात आणले आणि रसवंतीगृहासमोर उभी केली. सकाळी 6 वाजताच्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने प्रवासी महिलेला तो स्वत: बसचा वाहक असल्याचे सांगितले. तसेच गेली 15 वर्षे आपण चालक असल्याचे सांगून तो प्रवासी महिलेला बसमध्ये घेऊन गेला. त्यानंतर त्याने तिथे तिच्यावर जबरदस्ती केली, असे बस चालकाने आपल्या जबावात म्हटले आहे.
बलात्काराच्या घटनेनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वारगेट डेपोमधील 23 सुरक्षारक्षकांचे तत्काळ निलंबन केले आहे. महत्त्वाचे म्हणजे 27 फेब्रुवारीपासून नवीन सुरक्षारक्षक कामावर रुजू करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेप्रकरणी डेपो मॅनेजर, वाहतूक नियंत्रकांची चौकशी करावी आणि आठवड्याभरात अहवाल सादर करावा. परिवहन आयुक्तांकडे अहवाल सादर केल्यानंतर डेपो मॅनेजर आणि वाहतूक नियंत्रकांवर कारवाईचा निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच एकूणच महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात आढावा घेण्यासाठी 27 फेब्रुवारी रोजी एसटीच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची तत्काळ बैठक बोलवण्याचे निर्देशही प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.