कासोदा पोलिसांनी गांजा तस्करावर एनडीपीएस कायद्यानुसार.!!!
कासोदा प्रतिनिधी :-
कासोदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गांजा विक्री होत असल्याची माहिती मिळाल्याने, पोलिसांनी सापळा रचला होता. गेल्या पाच दिवसांपासून पोलीस या तस्करांचा शोध घेत होते. 25/02/2025 रोजी पोलिसांनी संशयित आरोपीला वनकोठे गावाजवळ ताब्यात घेतले. आरोपी मोटारसायकलवर प्लास्टिकच्या गोणीत गांजा घेऊन जात होता. पोलिसांनी गोणीची तपासणी केली असता, त्यात 19 किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा आणि मोटारसायकल असा एकूण 2,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी अजय रवींद्र पवार (वय 27, रा. सोनबर्डी, ता. एरंडोल) या आरोपीला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर पवार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजेशसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत सपोनि. निलेश राजपुत, पोउनि. दत्तु खुळे, पोहेकॉ. नंदलाल परदेशी, पोना. अकील मुजावर, पोना. किरण गाडीलोहार, पोना. नरेंद्र गजरे, पोकॉ. समाधान तोंडे आणि पोकॉ. लहू हटकर यांचा समावेश होता.या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि. निलेश राजपुत करत आहेत.