पाइल्स होण्याची कारणे आणि उपाय.!!!
चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी मुळे बऱ्याच जणांना मूळव्याधीची समस्या होते. एकदा ही समस्या झाली तर व्यक्तीचं उठणं बसणं दोन्हीही मुश्कील होऊन बसतं. मूळव्याध झाल्यावर गुदद्वारात असह्य वेदना होतात.आपल्याच काही चुकांमुळे ही समस्या होते. ही समस्या कधी कधी इतकी वाढते की, सर्जरी करण्याची वेळ येते.
कडूलिंबाचं फळ म्हणजे लिंबोळ्या मूळव्याध दूर करण्यासाठी फार फायदेशीर असतात. लिंबोळ्याचा एक खास मलम तयार करून लावला, तर मूळव्याधीमुळे आलेला कोंब गळून पडतो आणि मूळव्याध बरा होतो. यासाठी मूठभर लिंबोळ्या घेऊन त्यातील गर काढायचा. हा गर खोबऱ्याच्या तेलात टाकून गॅसवर चांगला परतवून घ्यावा. तो लालसर झाल्या नंतर मलम गाळून घ्यावा. काही दिवस सकाळी संध्याकाळ हा मलम लावा. याने मूळव्याधाचा कोंब गळून पडेल आणि आराम मिळेल. पाइल्स वाढण्याचं कारण बदलती लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्यात झालेले बदल. आजकाल फळं खाण्या ऐवजी त्यांचा ज्यूस घेतला जातो. यात फायबर नसतं. पण मोठ्या आतडी मध्ये केवळ फायबर आणि पाणी जातं. फास्ट फूडच्या चलनामुळे आणि फिजिकल अॅक्टिविटी कमी झाल्याने लोक पाणी कमी पितात, यामुळे पाइल्स होतात.
पाइल्स होण्याची कारणं.
बद्धकोष्ठता
जास्त तिखट, तेलकट, तसंच बाहेरचे पदार्थ जास्त खाणे.जास्त मांसाहार, मद्यसेवन, सिगारेट, तंबाखू सेवन.एका जागी बसून तासंतास काम करणे.सतत जास्त जागरण करणे.जेवणाच्या आणि कामाच्या अनियमित वेळा.कोरडे आणि शिळे अन्न खाणे.अनुवांशिकता.