IMG 20260804 WA1032

लाच स्वीकारताना पोलीस शिपाई रंगेहात; उपनिरीक्षकासह दोघांविरुद्ध एसीबीची कारवाई

59 / 100 SEO Score

लाच स्वीकारताना पोलीस शिपाई रंगेहात; उपनिरीक्षकासह दोघांविरुद्ध एसीबीची कारवाई

धुळे प्रतिनिधी :-

धुळे जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी (दि. ४ ऑगस्ट २०२६) धडक कारवाई करत पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाईला ₹४० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकासह दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या नातेवाईकाविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात सकारात्मक अहवाल न्यायालयात सादर करण्यासाठी सुरुवातीला ₹५० हजारांची लाच मागण्यात आली होती. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केली. पडताळणीनंतर ₹४० हजारांची लाच स्वीकारण्याचे निश्चित झाल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर एसीबीच्या पथकाने पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या परिसरात सापळा रचला. या कारवाईदरम्यान पोलीस शिपाई अविनाश अरविंद सादरे यांनी ₹४० हजारांची लाच स्वीकारताच त्यांना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक साईनाथ भगवानदास टेंबेकर यांचाही सहभाग आढळून आल्याने दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास त्वरित एसीबीशी संपर्क साधावा. अशा तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येते आणि योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाते.

1Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top