देशमुख महाविद्यालयात नेत्रदान जनजागृती कार्यशाळा.!!!
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने मरणोत्तर नेत्रदान जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेत भडगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. संतोष अहिरे यांनी ‘मरणोत्तर नेत्रदान’ या विषयावर विद्यार्थ्यांना तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. त्यांनी यावेळी बोलताना मरणोत्तर नेत्रदानाचे महत्त्व व त्यामागील भूमिका विशद केली.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा. जी. एस. अहिरराव हे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. एच. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. अर्चना टेमकर यांनी केले. कार्यशाळेला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.