सहा वर्षापासून पगार न मिळाल्याने शिक्षिकेची आत्महत्या, शाळा प्रशासनावर केले गंभीर आरोप.!!!
केरळमधील एका कॅथलिक शाळेच्या हलगर्जीपणाचा प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोझिकोड जिल्ह्यातील शाळा प्रशासनाने तीथे काम करणाऱ्या एका शिक्षिकेला तब्बल सहा वर्षांपासून पगार दिला नाही.
ज्यानंतर या महिलेने कंटाळून आत्महत्या केली. एलिना बेनी (२९) असे पीडित शिक्षिकेचे नाव असून ती कोझिकोड जिल्ह्यातील कोडेन्चेरी येथील सेंट जोसेफ लोअर प्रायमरी स्कूलमध्ये शिक्षिका होती. बुधवारी दुपारी ती घरात मृतावस्थेत आढळली, अशी माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली.
हे प्रकरण समोर आल्यानंतर केरळच्या शिक्षणमंत्र्यांनीही याची दखल घेतली आहे. शिक्षणमंत्री व्ही शिवनकुट्टी यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे म्हटले आहे. तर अलिनाच्या वडिलांनी शाळा प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. तिच्या मृत्यूला शाळा प्रशासन जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी त्यांची पोस्टिंग दुसऱ्या प्राथमिक शाळेत होती. एका कर्मचाऱ्याच्या निलंबनामुळे तिला ही नोकरी मिळाली. पण जेव्हा ती व्यक्ती परत आली तेव्हा माझ्या मुलीची नोकरी गेली. नंतर आम्ही या प्रकरणात हस्तक्षेप केला असता व्यवस्थापनाने गेल्या वर्षी जूनमध्ये तिला दुसऱ्या शाळेत पोस्टिंग दिली.
पीडित मुलीच्या वडिलांनी पुढे सांगितले की, शाळा प्रशासनाने माझ्या मुलीला शाळेत पाच वर्षांच्या कामासाठी कोणतेही वेतन नको असल्याचे लेखी देण्यास भाग पाडले. नंतर आपली नोकरी पक्की होईल या आशेने तिने ती मान्य केली. पण आता पगार न मिळाल्याने ती कमालीची निराश झाली होती. या कामासाठी आम्ही प्रशासनाला मोठी रक्कमही भरली होती. अनेक शिक्षकांना नऊ वर्षांपासून पगार मिळालेला नाही, असा दावा पीडितेच्या वडिलांनी केला आहे.
थामरासेरी धर्मप्रांताच्या कॉर्पोरेट एज्युकेशनल एजन्सीचे व्यवस्थापक फादर जोसेफ वर्गीस यांनी सांगितले की, अलीनासारखे अनेक शिक्षक एजन्सीअंतर्गत शाळांमध्ये काम करत आहेत. हे आरोप फेटाळून लावत ते म्हणाले, ‘त्यांच्या कायमस्वरूपी नियुक्तीसाठी शिक्षण विभागाकडे अर्ज करण्यात आला होता. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे तो मंजूर होऊ शकला नाही.