भडगाव तालुक्यात कोठली येथील जवान शहिद.!!!
भडगाव ता.प्रतिनिधी :-
तालुक्यातील कोठली येथील भुमिपुत्र प्रवीण अभिमन्यू पाटील ( वय ३० ) वर्ष सीआर पीएफ १३७ बटालीयनचा जवानाचा उधमपूर येथे देशसेवा बजावताना वीर मरण आल्याची माहिती दि. १८ रोजी दुपारी ३ वाजता हाती आली आहे.
ते बटालियन उधमपुर येथे कार्यरत असताना गोळी लागलेल्या परिस्थितीत त्यांना विरमरण आले आहे. सुमारे १२ वर्षांपासून ते देशसेवेत कार्यरत होते.त्यांचा स्वभाव अतिशय सोज्वळ होता. गेल्या आठवड्यात कोठली येथे आई वडिलांच्या चरणी नतमस्तक होऊन नातेवाईक व मित्र परिवार यांना भेटुन ते कर्तव्यावर परतले होते. त्यातच अशी अचानक दुःखद वार्ता गावावर ऐकु आल्याने सर्वत्र शोकाकळा पसरलेली आहे.
त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, वहिनी, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी असा परिवार आहे.
त्यांचे पार्थिव गावावर आण्यासाठी गावातील नातेवाईक रवाना झाले आहेत.माञ पुढील माहीती पोलीस प्रशासनाकडे केली असता पोलीस पाटील अतुल पाटील यांनी यि घटनेची माहीती पोलीस स्टेशनला कळविलेली आहे. माञ घटनेची अधिकृत माहिती प्रशासनाकडुन कळु शकली नाही.