गोंडगाव विदयालयात शिवजयंती उत्साहात साजरी.!!!

0 58

गोंडगाव विदयालयात शिवजयंती उत्साहात साजरी.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

चाळीसगाव येथील रा. स. शि. प्र. मंडळ संचलीत गोंडगाव माध्यमिक विदयालयात शिवजयंती उत्सव दि. १९ रोजी बुधवारी सकाळी ८ वाजता उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीस श्री. शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे व प्रतिमेचे पुजन व माल्यार्पण विदयालयाचे मुख्याध्यापक बापुसो, श्री. कल्याणराव वाघ यांनी केले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी श्री. शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे व प्रतिमेचे पुजन केले. यावेळी शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. विदयार्थी व विदयार्थीनींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विदयालयाचे मुख्याध्यापक बापुसो, श्री. कल्याणराव वाघ, श्री.पी. व्ही. जाधव, श्री.एस. डी. चौधरी, व्ही. ए. पाटील, श्री.पी. व्ही. सोळंके, श्री.बी. डी. बोरसे, श्री.एस. एस. आम्ले, श्री.एन. ए. मोरे, श्री. आर. बी. महाले, श्री.एस. जी. भोपे, श्री.ए. एम. परदेशी, श्री.एस. एल. मोरे, श्री.व्ही. एम. जाधव यांचेसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विदयार्थी, विदयार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा