वाळुची चोरटी वाहतुक करणारे डंपर वलवाडी गांवा जवळ पकडले; उपविभागाय पोलिस अधिकाऱ्यांनच्या पथकाची धडक कारवाई
वाळुची चोरटी वाहतुक करणारे डंपर वलवाडी गांवा जवळ पकडले; उपविभागाय पोलिस अधिकाऱ्यांनच्या पथकाची धडक कारवाई
भडगाव प्रतिनिधी :-
तालुक्यासह शहरात गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू चोरी करुन वाहतूक करण्याचा हा संपूर्ण जळगांव जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत असून यावर सतत कारवाई करून सुद्धा वाळूमाफिया हे गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू उत्खनन सुरूच ठेवत आहेत यावर आज सकाळी पाच वाजता चाळीसगाव उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश चंदेल यांच्या पथकातील पो.हे.कॉ. संभाजी पाटील, रविंद्र पाटील,राजेंद्र निकम व ज्ञानेश्वर बडगुजर यांनी ही कारवाई केली यावेळी डंपर ड्रायवर अनिल मलखन वंजारी रा. पळासखेडे व डंपर मालक रविंद्र पवार रा. पेठ भडगाव हे आहेंत अशी माहिती पथकाने दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की भडगाव तालुक्यात व भडगाव शहरात गिरणा नदी पात्रातून दररोज ५० ते ६० डंपर व शेकडो ट्रॅक्टर हे अवैध वाळू वाहतूक करतात यावर गेल्या दोन महिन्यांपासून भडगाव महसूल विभागाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारलेला आहे व तो बडगा कायम सुरू राहणार आहे. यातच आज सकाळी चाळीसगाव उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश चंदेल यांच्या पथकाने सकाळीं पाच वाजता वलवाडी गावाच्या दरम्यान डम्परांवर कारवाई केली. अवैध वाळू वाहतुकीचे येथील हे डंपर पोलीस स्टेशन येथे जप्त करण्यात आले असून ते पुढील कारवाईसाठी भडगाव महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आले असून सदर डंपरवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती भडगांव तहसिलदार शितल सोलाट यांनी दिली