क्राईमजळगावमहाराष्ट्र

भडगाव महसूल आणि पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणारा एक डंपर जप्त.!!!

भडगाव महसूल आणि पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणारा एक डंपर जप्त.!!!

 

भडगांव येथील गिरणा नदी पात्रातून सर्रासपणे अवैध वाळु चोरी भडगांव महसुल व पोलिस प्रशासनाची धडक कारवाई सुरुच; अवैध वाळू चोरी करून वाहतुक करतांना १ डंपर जप्त

 

 

भडगाव प्रतिनिधी :-

गिरणा नदीपात्रातून जेसीबीच्या सहाय्याने अवैध वाळू उत्खनन करून ते ट्रॅक्टर द्वारे जागो जागी वाळूचे थप्पे मारून त्या ठिकाणाहून डंपरद्वारे चाळीसगांव या ठिकाणी घेऊन जात असताना दि. १८ फ्रेबुरवारी च्या मध्यरात्री १ वाजता भडगांव महसूल प्रशासना सह भडगांव पोलिस प्रशासनाच्या पथकांनी मौजे भोरटेक बु. येथुन एक अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर जप्त करण्यात आले आहे. हे डंपर चालक मालक समाधान साहेबराव पाटील रा. लोहटार ता. पाचोरा यांच्या मालकीचे असल्याचे महसुल पथकाने सांगितले

 

हे डंपर भडगांव तहसील कार्यालय आवार या ठिकाणी जमा करण्यात आले आहे.

 

या डम्परांवर महसूल विभागाची दंडात्मक कारवाई, व आरटीओकडे हे वाहन वर्ग करण्यात येणार असुन कारवाईत सातत्य राहणार असल्याची माहिती तहसिलदार श्रीमती शितल सोलाट यांनी दिली.

 

हि कारवाई तहसीलदार श्रीमती शितल सोलाट यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम महसूल अधिकारी शितल राजपुत भोरटेक बु., अविनाश जंजाळे भडगांव,मंडळाधिकारी दिनेश येंडे गिरड,डि.एस. काळे वाडे,शुभम चोपडा, जुवार्डी,कविता सोनवणे कोतवाल भोरटेक बु. तसेच पोलिस प्रशासनाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के व कर्मचारी यांच्या पथकाने केली आहे.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!